sidhu moosewala murder case navnath surwanshi mahakal call target down we got money pune  Sakal
पुणे

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण : काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले

नवनाथ सुर्यवंशीचा महाकालला सिग्नलवर कॉल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचाखून झाल्यानंतर नवनाथ सूर्यवंशी याने एक जून रोजी सिद्धेश ऊर्फ महाकाल कांबळेला सिग्नलवर कॉल करून, ‘काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत,’ असे सांगून बँक खाते क्रमांक मागितला, तसेच ‘आपण गुजरातमध्ये असून, संतोष जाधव पण इथे येणार आहे,’ असे सांगितले होते. याशिवाय संतोष व त्याच्या मित्रांनी हरियानातील अंबाला कँटोन्मेंट येथे पिस्तुलाचा धाक दाखवून लुटालूट केली होती, असे सिद्धेश कांबळे याने पोलिसांना तपासात सांगितले आहे.

मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव याला कुख्यात लॉरेन्स बिष्णोई याचा साथीदार विक्रम ब्रार याने मध्य प्रदेशात दोन पिस्तुले व दारूगोळा आणण्यासाठी पाठविले होते. त्यापैकी एका पिस्तुलाचा वापर बाणखेलेच्या खुनासाठी केल्याची कबुली जाधव याने पोलिस तपासात दिली आहे. याशिवाय जाधवच्या टोळीतील सदस्यांकडून १३ पिस्तुले जप्त करण्यात आली असून, मध्य प्रदेशातील जॅक स्पॅरो नावाच्या व्यक्तीकडून ती मिळविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी सोमवारी (ता. २०) विशेष न्यायालयाला दिली. संतोष सुनील जाधव (वय २७, रा. पोखरी, आंबेगाव, सध्या रा. मंचर) आणि त्याला फरारी असताना आश्रय देणारे सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाल (वय १९, रा. नारायणगाव, जुन्नर), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, विखले, खटाव, सातारा, सध्या रा. भूज, गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव, जुन्नर) यांना विशेष न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आंबेगावमधील एकलहरे गावात ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात संतोष जाधवसह चौदा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी संतोष व त्याच्या साथीदारांवर नारायणगाव पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणखेलेच्या खुनानंतर जाधव बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे वास्तव्यास

ओंकार बाणखेलेचा खून केल्यानंतर संतोषने देशात विविध ठिकाणी बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे वास्तव्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके या ठिकाणी तपासासाठी तैनात करण्यात आली असून, संतोषच्या टोळीतील साथीदारांचा शोध घेतला जात आहे. कांबळे आणि शिंदे यांनी जाधवला फरारी असताना लपून राहण्यास मदत केली आहे. त्याबाबत तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी ॲड. बोंबटकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT