Nanded City Signal Issue Sakal
पुणे

Signal Issue : नांदेड सिटी गेट समोरील सिग्नल सुरू मात्र कोणीही नियम पाळेना; पोलिस नसल्याने वाहतूक कोंडी

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट समोरील सिग्नल पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे.

निलेश बोरुडे

किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट समोरील सिग्नल पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र बेशिस्तीची सवय लागलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे सिग्नल तोडण्यात येत आहे. कारवाईसाठी या ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी थांबत नसल्याने सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नोकरदार, विद्यार्थी, स्थानिक नागरिक व पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

या ठिकाणी दोन्ही बाजूंना असणारी दुकाने व टपऱ्यांसमोर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांचाही वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

अनेक दिवसांपासून बंद असलेला सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट समोर असलेला सिग्नल वाहतूक पोलिसांनी सुरू केला खरा परंतु त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांची संख्या जास्त असल्याने व कारवाई करण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी एकही पोलिस कर्मचारी थांबत नसल्याने कोणीही या सिग्नलचे नियम पाळताना दिसत नाही.

सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असून सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानांपुढे थेट रस्त्यावर वाहने उभी करुन नागरिक खरेदीसाठी किंवा इतर कामांसाठी जात असल्याने त्या वाहनांमुळेही वाहतूक सुरळीत होण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

याबाबत सिंहगड रोड वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी पांडुरंग वाघमारे यांचे लक्ष वेधले असता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

"सिग्नलचे नियम कोणीही पाळत नाही. नागरिकांना सवय लागेपर्यंत पोलिस कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे. जे वाहनचालक रस्त्यावर वाहने उभी करुन जातात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे." सुनिल पायगुडे, नागरिक.

'सिग्नलचे नियम पाळणारांना या ठिकाणी अडकून पडावे लागत आहे. जे मधेच गाडी घालतात तेच अरेरावीची भाषा करतात. पोलिसांनी वाहतूक नियमनाकडेही लक्ष द्यावे.'

- भावेश पाटील, नागरिक.

'मनुष्यबळ कमी असल्याने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात अडचण येत आहे. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होताना दिसल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, तसेच रस्त्याच्या कडेने असलेल्या व्यावसायिकांनाही नोटीसा देण्यात येणार आहेत. सिग्नल सुरू ठेवायचा की बंद करायचा याबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल.'

- पांडुरंग वाघमारे, प्रभारी अधिकारी, सिंहगड रोड वाहतूक विभाग, पुणे शहर पोलिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT