adar poonawalla sakal media
पुणे

बुस्टर डोसमधील अंतर कमी करा; अदर पुनावालांची केंद्राला विनंती

नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील सर्वांना तिसरा डोस देण्यास परवानगी दिली आहे.

निनाद कुलकर्णी

पुणे : जगासह देशभरात कोरोना रूग्णांची (Corona) संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा तिसरा डोस (Booster Dose) देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. या सर्वामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याची विनंती केंद्राकडे केली असून, दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नऊ महिन्यांऐवजी सहा महिन्यांवर करण्याचे आवाहन त्यांनी केंद्राला केले आहे. (Adar Poonawalla On Booster Dose)

पुनावाला म्हणाले की, सध्या तिसरा डोस घेणाऱ्यांची संख्या थोडी धिम्या गतीने सुरू आहे.याचे मुख्य कारण म्हणजे केंद्राकडून तिसऱ्या डोससाठी लावण्यात आलेला नियम आहे. कोरोना लसीचा तिसरा डोस घेणाऱ्या व्यक्तीने दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच कोरोनाचा तिसरा डोस घेता येत आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचा तिसरा डोस घेणाऱ्यांची गती धिम्या गतीने सुरू आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील नऊ महिन्याचे अंतर हीच यामागची मुख्य अडचण आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नऊ महिन्यांऐवजी सहा महिन्यांवर कमी करण्याचे आवाहन आपण केले असल्याचे पुनावाला यांनी सांगितले. (Booster Dose News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT