बालगंधर्व रंगमंदिर - गायिका कौशिकी चक्रवर्ती यांना शनिवारी पुलोत्सवात ‘तरुणाई’ सन्मान प्रदान करण्यात आला.  या वेळी (डावीकडून) गजेंद्र पवार, चक्रवर्ती, कीर्ती शिलेदार व कृष्णकुमार गोयल.
बालगंधर्व रंगमंदिर - गायिका कौशिकी चक्रवर्ती यांना शनिवारी पुलोत्सवात ‘तरुणाई’ सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) गजेंद्र पवार, चक्रवर्ती, कीर्ती शिलेदार व कृष्णकुमार गोयल. 
पुणे

गायिका कौशिकींचा तरुणाईला ‘लाइफ मंत्रा’

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘तरुणाईने इंटरनेट, फेसबुकवर अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. इंटरनेटच्या अतिवापरामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातली सृजनशीलता, कस कमी होत चालला आहे. दररोज प्रत्येक गोष्ट फेसबुकवर अपडेट करण्यापेक्षा सहा दिवस काही सकस काम करा, मग सातव्या दिवशी तुमच्या कामाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहा, बोला,’’ अशा शब्दांत शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी तरुणाईला ‘लाइफ मंत्रा’ दिला. 

तरुणाईला शास्त्रीय संगीतही आपलेसे वाटेल, अशी स्वतःची खास शैली असलेल्या शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांना पुलोत्सवात पुल ‘तरुणाई’ सन्मानाने गौरवण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. पु.ल. परिवाराने आयोजित केलेला हा सोहळा शनिवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा व ज्येष्ठ कलावंत कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते चक्रवर्ती यांना  ‘तरुणाई’ सन्मान बहाल करण्यात आला. या वेळी पु.ल. परिवाराच्या वतीने त्यांची मुलाखतही घेण्यात आली. 

चक्रवर्ती म्हणाल्या, ‘‘पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आपल्याला हा बहुमोल सन्मान मिळाल्यामुळे अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्रातला एवढा मोठा साहित्यिक बंगालमध्ये येऊन बंगाली भाषा शिकतो, इतकंच नाही तर बंगालीत लिहितो, याचा अभिमान वाटतो. सवाई गंधर्व महोत्सव, पं. भीमसेन जोशी या सर्वांमुळे मराठी आणि महाराष्ट्राशी आपले खास नाते जडले आहे. सांगीतिक करिअरमध्ये सवाईसारख्या महोत्सवाने आपल्या कलेला सर्वाधिक दाद दिली.’’ कांदे-पोहे, मोदक, वरण-भात, मिसळ-पाव असे मराठी खाद्यपदार्थ मला विशेष आवडतात, अनेक मराठी चाहते खूप प्रेमाने मला हे पदार्थ खाऊ घालतात, त्यामुळे मराठी माणसांशी माझे अतूट भावनिक नाते बनले आहे व त्यामुळे मी समृद्ध झाले आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. पुलंचे बंगाली भाषेशी, रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याशी असलेले भावबंधही त्यांनी उलगडले.

रसिकांची उत्स्फूर्त दाद
पुणेकर चाहत्यांच्या मराठी गाण्याच्या आग्रहास्तव चक्रवर्ती यांनी ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा अभंगही गाऊन सादर केला. यावर मंत्रमुग्ध झालेल्या चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT