पुणे

Pune News : सिंहगड पायथ्याशी मोठ्या प्रमाणात मद्य व गुटख्याचा साठा जप्त; उपद्रवी पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

वन विभाग व सामाजिक संस्थेची संयुक्त तपासणी मोहीम

निलेश बोरुडे

सिंहगड: सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर वन विभाग व राजे शिवराय प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या 'सिंहगड रक्षण मोहिमेतून' पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करत मोठ्या प्रमाणात मद्य, गुटखा व सिगारेटची पाकिटे जप्त करुन नष्ट करण्यात आली.

ज्या उपद्रवी पर्यटकांकडे मद्याच्या बाटल्या आढळून आल्या त्यांच्यावर वन विभागाकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तपासणी सुरू असलेली पाहून कारवाईच्या भीतीने अनेक पर्यटक माघारी फिरताना दिसत होते.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पर्यटक सिंहगडावर येतात. गडावर जाताना मद्य, गुटखा, सिगारेट किंवा इतर नशेचे पदार्थ सोबत घेऊन जाण्यास वन विभागाने बंदी घातलेली आहे.

तसेच याबाबत विविध सामाजिक संस्था व वन विभागाच्या वतीने सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. असे असताना अनेक उपद्रवी पर्यटक गडावर जाऊन मद्यप्राशन करतात व गडाचे पावित्र्य भंग करतात.

यावर्षी सकाळपासून राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे व अध्यक्ष शिवाजी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्देश काप, प्रशांत हरेकर, हर्षल तापकीर, रुपेश सपकाळ, प्रमोद जोरी, नकुल थावरे, मयुर शेडगे,

अजय सावंत, तुषार शिंदे, सागर कांबळे, हर्षद खरात, सागर काळोखे, सागर कदम, प्रियेश तिखे , शुभम चांदेरे, अजिंक्य सुतार , प्रशांत बालवडकर , अजय निम्हण , गणेश निम्हण , संतोष गटकल आदींनी वनपाल समाधान पाटील , वनरक्षक बळीराम वायकर, वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी यांच्यासह गडावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली व मोठ्या प्रमाणात मद्य, गुटखा व सिगारेटची पाकिटे जप्त करुन नष्ट केली.

"मागील अठरा वर्षांपासून राजे शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सातत्याने आवाहन करुनही सुधारणा होताना दिसत नाही. उपद्रवी पर्यटकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे."

- महेश पवळे, संस्थापक राजे शिवराय प्रतिष्ठान.

"मद्य, गुटखा व सिगारेटची पाकिटे जप्त करुन नष्ट करण्यात आली आहेत. संबंधित उपद्रवी पर्यटकांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे."

- समाधान पाटील, वनपाल, खानापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT