Sinhagad nuisance charges now control only the forest department 
पुणे

सिंहगडच्या उपद्रव शुल्क नाक्यावर आता फक्त वन विभागाचा ताबा 

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला :  सिंहगडावर जाणारा घाट रस्ता हा वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्यावर वन विभागाने वन संरक्षण समितीच्या माध्यमातून गोळेवाडी(डोणजे) व कोंढणपूर येथे उपद्रव शुल्क नाका सुरू केला होता. समितीत वादविवाद होत असल्याने त्यावर तोडगा म्हणून वन विभागाने समित्यांचे नाक्यावरील अधिकार काढले आहेत. आणि ते अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत. असे असले तरी वन संरक्षण समितीने घेतलेल्या सुरक्षा रक्षकांना कमी केले जाणार नाही. असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

वन विभागाने सिंहगडाच्या विकासासाठी लोकसहभाग उपद्रव शुल्क नाका 2008मध्ये सुरू केला. या उपक्रमाचे कौतुक झाले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वनसंरक्षण समितीच्या निवडीवरून वाद विवाद वाढले होते. त्यामुळे, वन विभागाने हा निर्णय घेतला 

दरम्यान, घेरा सिंहगड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत टोल नाका बंद करण्याची मागणी केली. टोल नाका बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. वनखात्याने या वनसंरक्षण समितीचा सहभाग काढुन आपल्या ताब्यात टोल नाका घेतला. असे घेरा सिंहगडचे उपसरपंच अमोल पढेर यांनी सांगितले. 

वन विभागाचे हवेली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार म्हणाले, उपद्रव शुल्क नाका वन विभागाचा असून स्थानिकांचा केवळ सहभाग होता. 
स्थानिक ग्रामस्थांच्या वादामुळे हा टोल नाका वन विभागाने रितसर ताब्यात घेतला आहे. या बाबत धर्मादाय आयुक्तांना कळविले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT