Sinhgad-Institute
Sinhgad-Institute 
पुणे

‘सिंहगड’च्या कर्मचाऱ्यांचा पगार दीड महिन्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराबाबत धीर धरावा. हे पगार येत्या दीड महिन्यात हमखास दिले जातील, असे सिंहगड कृती समितीचे प्रमुख राजेंद्र देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. काही अपवाद वगळता कृती समितीला बहुतांश शिक्षक-शिक्षकेतरांचा पाठिंबा आहे. संस्था अडचणीत असल्याने सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली. 

सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीच्या विविध घटक संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या बावीस महिन्यांपासून थकीत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. यातील एक गट संस्थेच्या विरोधात आंदोलन करीत आहे. मात्र बहुतांश कर्मचारी संलग्न असलेल्या सिंहगड कृती समितीने सामोपचाराची भूमिका घेत संस्थेला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. संस्थेला आणखी दीड महिना वेळ देण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. या संदर्भात देशमुख म्हणाले, ‘‘पगारावरून गेल्या एक-दीड वर्षापासून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आवारात शिक्षक व कर्मचारी आंदोलन करत आहूेत. तंत्रशिक्षण संचालनालय व समाजकल्याण विभागाकडून अंदाजे १३२ कोटी रुपये व विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्काची ९० कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. मागील शैक्षणिक वर्षातील ११७ कोटी रुपये समाजकल्याण विभागाकडून अद्याप येणे आहेत. ही रक्कम या महिनाअखेरपर्यंत मिळविण्यासाठी कृती समिती कार्यरत आहे.’’

या पत्रकार परिषदेला कृती समितीचे पीयूष गवळी, शैलेश भोसले, शरद पाटील आणि सारिका व्यवहारे उपस्थित होत्या.

मालमत्ता विकून वेतन देणार - नवले
धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांच्याकडून लेखी पत्र देण्यात आले आहे. येत्या दीड महिन्यात थकीत रक्कम न मिळाल्यास आपल्या कार्यालयाची यथोचित मान्यता घेऊन संस्थेची एखादी मालमत्ता विकून येणाऱ्या रकमेतून प्रलंबित वेतन दिले जाईल, असे लेखी आश्‍वासन प्रा. नवले यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिले आहे. सध्या संस्थेत वा संस्थेबाहेर आंदोलन करणारे आंदोलनकर्ते हे कृती समितीचा भाग नाहीत, असेही सिंहगड कृती समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT