आगामी नगरपरिषद निवडणूकीत सहा नगरसेवक निवडून येतील : राहुल मखरे sakal
पुणे

आगामी नगरपरिषद निवडणूकीत सहा नगरसेवक निवडून येतील : राहुल मखरे

नगरपरिषदेत स्वच्छ कारभार,दलाली मुक्त कामे, स्वच्छ इंदापूर, विकास कामांना प्राधान्य देण्याचे विषय व मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहे.

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर नगरपरिषद प्रशासन कामावर अंकुश ठेवण्याचे काम जबाबदार विरोधी पक्ष म्हणून केल्याने आगामी नगरपरिषद निवडणूकीतपाच ते सहा नगरसेवक निश्चित निवडून येतील असा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांनी केला. आगामी इंदापूर नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ॲड. मखरे पुढे म्हणाले, आम्ही इंदापूर शहर जनतेच्या अडचणी सोडविण्या साठी आंदोलने केली. इंदापूर नगरपरिषद हद्दीत होणाऱ्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवले .निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश करून ही कामे दर्जेदार करून घेतली. त्यामुळे शहरातील नागरिकांचा आमच्यावर विश्वास असल्याने आम्ही इंदापूर नगरपालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढवू.

नगरपरिषदेत स्वच्छ कारभार,दलाली मुक्त कामे, स्वच्छ इंदापूर, विकास कामांना प्राधान्य देण्याचे विषय व मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहे. या निवडणूकीत आम्हाला दोन मते कमी पडली तरी चालतील पण आम्हीआमची विचारधारा कधीही सोडणार नाही.माझ्याकडे सत्ता आल्यास मी सर्वांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देईल असे मत शेवटी ॲड. राहुल मखरे यांनी मत व्यक्त केले.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे बाबासाहेब भोंग ,संजय शिंदे,संतोष क्षिरसागर,सुरज धाईंजे, वसीम शेख, प्रकाश पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

SCROLL FOR NEXT