003Court_Decision_h_8_0_3.jpg
003Court_Decision_h_8_0_3.jpg 
पुणे

माओवादी संबंध प्रकरणी क्लोन कॉपीसाठी जाणार सहा महिन्यांचा कालावधी 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आरोपींना क्लोन कॉपी मिळण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

क्लोनिंग करण्याची कार्यपध्दती वेळखाऊ असून या खटल्यातील नऊपैकी केवळ दोन आरोपींनाच क्लोन कॉपी मिळाली आहे. उर्वरीत आरोपींना क्लोन कॉपी मिळण्याकरिता किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती बचाव पक्षाचे वकिल राहुल देशमुख यांनी दिली.

सुनावणी असल्यामुळे आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी इंनकॅमेरा क्लोन कॉपी देण्यात आली. या प्रकरणातील 9 आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार त्यांना क्लोन कॉपी देण्याचे काम सुरु झाले आहे. पोलिसांनी एकूण 18 इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस जप्त केले आहेत. त्या प्रत्येक डिव्हाईसची क्लोन कॉपी तयार होण्यास सहा तासांचा कालावधी लागतो. याप्रमाणे प्रत्येक डिव्हाईची 9 कॉपी करण्यात येत आहे. 

दरम्यान न्यायालयाकडे आरोपींच्या जामिनाची मागणी करण्यात आली होती. जामिन मिळाल्यानंतरही क्लोनिंगची प्रक्रिया सुरु ठेवावी, असे ऍड. देशमुख यांनी सांगितले.

या प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष न्यायाधिश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा शेण, अरुण फरेरा, वर वरा राव, महेश राऊत, व्हर्नोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज, रोना विल्सन यांना एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जामिनासाठी अॅड. सिद्धार्थ पाटील, अॅड. राहुल देशमुख आणि अॅड. पार्थ शहा यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT