Sixty three million scam in SRPF canteen at pune
Sixty three million scam in SRPF canteen at pune 
पुणे

एसआरपीएफच्या कॅन्टीनमध्ये 63 लाखांचा अपहार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : रामटकेडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) कॅन्टीनमध्ये 62 लाख 98 हजार 956 रूपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षकावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सहाय्यक उपनिरीक्षक रणजित जगन्नाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रमेश बबन बेठेकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक बेठेकर हे एसआरपीएफ बल गट क्रमांक एक येथे कल्याणकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर जाधवकडे एसआरपीएफच्या कॅन्टीनची जाबाबदारी होती. तळेगाव येथील मुख्य कॅन्टीनमधून रामटेकडी येथील कॅन्टीनसाठी धान्य, संसारोपयोगी वस्तू यासह इतर माल खरेदी केला जातो. जाधव यांनी हा सर्व माल उधारीवर उचलून तळेगाव येथील कॅन्टीनला पैसे दिले नाहीत. त्याबाबत तक्रार आल्यानंतर याची चौकशी करण्यात असता त्यात तफावत आढळून आल्याने जाधव यांनी अपहार केल्याचा संशय आला. 

एसआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने त्याचा अहवाल नुकताच सादर केला आहे. त्यात 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत जाधव यांनी 62 लाख 98 हजार 956 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. जाधव यांनी त्यांची हा आरोपही मान्य केला आहे. त्यानुसार याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वजीत जगताप करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT