Panchnama
Panchnama Sakal
पुणे

बायकोला घेतली साडी; मेव्हण्याने केली कडी!

सु. ल. खुटवड

आपल्याला काही कळत नाही तर गप्प बसावं ना? कशाला साडीखरेदी करायची. किमान आपल्या बायकोकडे असली साडी नाही ना? याची तरी खात्री करायची ना? जी साडी मी पाचशे रुपयांत घेतली, अगदी सेम टू सेम साडी हा बाबा पाच हजाराला घेऊन आलाय.

बाई गं! माझ्याच नशिबी असला नवरा कसा काय आला? मी म्हणून टिकले, दुसरी एखादी असती ना तर ती कधीच पळून गेली असती, सुनंदाने समीरला चांगलेच धारेवर धरले. बऱ्याच दिवसांपासून सुनंदा ‘मला एकही चांगली साडी नाही’ असे सारखी म्हणायची. नेमकी ही गोष्ट लक्षात ठेवून तिला सरप्राईज द्यावं म्हणून समीरने मुद्दाम भारी साडी खरेदी केली होती. ‘तुम्ही आताच्या आता ही साडी बदलून आणा’, सुनंदाने लकडा लावला. ‘अगं सेलमध्ये स्वस्त मिळाली म्हणून मी साडी आणलीय. आता तो सेल संपला आहे,’ समीरने चाचरत म्हटले. ‘स्वस्त? पाचशेची साडी पाच हजारात आणलीय आणि वर स्वस्त मिळाली म्हणताय...’ त्यानंतर समीरने कानात कापसाचे बोळे घातले. सुनंदाचे फक्त ओठ हलत असल्याचे त्याला दिसले.

दुसऱ्या दिवशी सुनंदाने ती साडी वटपौर्णिमेनिमित्त नेसली. नटूनथटून ती सोसायटीतील बायकांसोबत वड पुजायला गेली. त्यावेळी अनेकींनी साडीची चौकशी केली. ‘खास वटपौर्णिमेनिमित्त यांनी साडी आणली. यांच्या ओळखीचाच दुकानदार असल्याने त्याने फक्त दहा हजारांत दिली’, असं सांगून अनेकींवर इंप्रेशन मारून, फोटोसेशन केलं. ‘नवऱ्याचं प्रेम. नव्या साडीत वटपौर्णिमा’ अशी कॅप्शन देत तो फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि त्याला मिळणाऱ्या लाईक आणि कमेंट्स दर पाच मिनिटांनी ती पाहू लागली. साडी खरेदीच्या घटनेनंतर समीर सावध झाला. बायकोची बोलणी खायची नसतील तर आपण खरेदी केलेली वस्तू निम्म्यापेक्षा कमी किमतीत घेतल्याचे तो सांगू लागला. पण भाजीपाला खरेदीत त्याचं खोटं बोलणं खपून जायचं.

मात्र, एक किलो साखर पंधरा रुपयांत आणली व एक लिटर पेट्रोल पन्नास रुपयांत भरले, असं एकदा सांगितल्यावरून त्याने सुनंदाची चांगलीच बोलणी खाल्ली होती. चुकून बोललो, असे सांगून त्याने सारवासारव केली. पण कशाचे भाव निम्म्याने कमी सांगायचे आणि कशाचे स्थिर ठेवायचे, हे तो आता बरोबर सांगू लागला आहे. एकदा समीरने आख्खा दिवस खर्च करून, सहा हजार रुपयांचा एक ड्रेस खरेदी केला व खुशीतच घरी आला. घरी आल्यानंतर त्याला मेव्हणा आल्याचे दिसले. आपल्या चेहऱ्यावरील नाराजी लपवत, त्याने कधी आला? असं प्रेमानं त्याला विचारलं. सुनंदाने समीरचे नवीन कपडे बघितले. ‘केवढ्याला घेतला ड्रेस?’ असं तिने विचारल्यावर समीरने सेलमध्ये पाचशे रुपयाला घेतला, असे फुशारकीने सांगितले. त्यावर ‘अय्या खरंच!’ असे म्हणून सुनंदाने आनंद दर्शवला. ‘अहो, उद्या सकाळी प्रशांत गोव्याला चाललाय. जाण्यापूर्वी तो भेटायला आलाय. त्याला हा ड्रेस द्या. किती शोभून दिसेल त्याला. तुम्ही हे पाचशे रुपये घ्या आणि तुम्हाला दुसरा घ्या,’ असे म्हणून सुनंदाने पाचशे रुपयांची नोट समीरच्या हातावर टेकवली. समीर मात्र एकदा त्या ड्रेसकडे तर एकदा मेव्हण्याकडे बघू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT