malnutrition 
पुणे

मेळघाटातील कुपोषण अन् विरोधकांचे पोषण

सु. ल. खुटवड

खावं, प्यावं आणि कोठेही हिंडावं, हेच शंकररावांचं आयुष्य होतं. त्यामुळेच ‘तुम्ही फक्त खर्च करा, आम्ही चोवीस तास तुम्हाला साथ देऊ’ ही त्यांची कॅचलाईन बनली होती. कोणीतरी हरकाम्या सोबतीला असावा म्हणून मित्रही त्यांना शक्यतो टाळत नसत.  

काही दिवसांपूर्वी सात - आठ मित्रांनी मेळघाटात फिरण्याची टूम काढली आणि शंकरराव एका पायावर तयार झाले. पंधरा दिवस तरी एश करू, या विचाराने ते आनंदीत झाले. स्कॉर्पिओ गाडीतून सगळी मित्रमंडळी मेळघाटात पोचली. तिथे व्याघ्र प्रकल्पासह अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. शंकररावांना मधाच्या पोळ्याची फारच आवड होती. त्यामुळे गाडीतून उतरल्यानंतर पोळ्याचा शोध घेणे, हे त्यांचे महत्त्वाचे काम बनले. मात्र, एकदा मधाच्या पोळ्याच्या नादात शंकरराव जंगलात खूप दूर अंतरावर भरकटत गेले. परत गाडीपर्यंत येणे त्यांना  शक्य झालं नाही. मित्रांनीही त्यांचा खूप शोध घेतला. पण सगळं व्यर्थ ! चकवा झाल्याप्रमाणे शंकरराव एकटेच जंगलात हिंडू लागले. मधाच्या पोळ्याशिवाय त्यांना खायला दुसरं काही मिळेना. आठ- दहा दिवसांतच मधाचाही त्यांना कंटाळा आला. त्यामुळे उपास घडू लागले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकदा एका पाणवठ्यावर अंघोळ करत असताना बाहेर ठेवलेली कपडेही एका माकडाने पळवून नेली. तेव्हापासून शंकरराव झाडाची पाने कंबरेला लावून अन्नासाठी फिरू लागले. महिनाभरात त्यांचे पोट खपाटीला गेले. या जंगलात आपल्याला कधीतरी माणसाचे दर्शन घडेल व आपण परत माणसात येऊ, अशी आशा ठेवून, शंकरराव सतत हिंडू लागले. मात्र, उपाशीपोटी उन्हा- तान्हात सतत फिरत राहिल्याने आधीचा काळा रंग अधिकच गडद झाला. वजन घटून अवघ्या वीस किलोवर आले. छातीच्या बरगड्या दिसू लागल्या. चेहऱ्याचीही अवस्था फार वाईट झाली. आपण आता जगत नाही, ही भावना मधूनच त्यांना अस्वस्थ करू लागली. 

एकदा असेच भटकत असताना दोन परदेशी नागरिक त्यांना जंगलात दिसले. त्यांना पाहून शंकररावांनी जागीच उड्या मारायला सुरवात केली. ‘‘खायला द्या. काहीतरी खायला द्या’’ शंकरराव हात तोंडाकडे नेऊन एवढेच बोलू लागले. परदेशी नागरिकही इंग्रजीतून बोलू लागले. पण या दोघांच्या भाषेचा मेळ जमेना. ‘ही कसलीतरी आदिवासी भाषा असावी’, असा समज परदेश नागरिकांचा झाला. `आपल्या मराठी भाषेचा येथे काही उपयोग नाही’, हे शंकररावांनी ओळखले व त्यांनी फक्त खुणांचा वापर करून, खायला मागायला सुरवात केली. 

मात्र, छाती व पोट खपाटीला गेलेले, रंग काळा भिन्न, कंबरेभोवती झाडाची पाने गुंडालेली व्यक्ती सतत खायला मागतेय हे पाहून, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे, याची जाणीव परदेशी नागरिकांना झाली. त्यांनी लगेचच व्हिडिओ शुटींग करायला सुरवात केली. ते करत असताना काही खाद्यपदार्थही त्यांनी शंकररावांना दिले. कितीतरी दिवसांनी खाद्यपदार्थ पाहून शंकरराव त्यावर तुटून पडले. अधाशासारखे खाऊ लागले. या घटनेचं सगळं चित्रीकरण त्यांनी केलं. ‘मेळघाटात कुपोषणामुळे आदिवासी व्यक्ती मरणपंथाला’ असे शीर्षक देत त्यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकला आणि महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली. अनेकांनी हा व्हिडिओ फेसबुक, व्हॉटसॲपवरसारख्या समाजमाध्यमांवर व्हायरल केला.   

महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात मेळघाटात अजूनही कुपोषणामुळे आदिवासींचा मृत्यू होत असल्याचे पाहून विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण, अर्णव गोस्वामी, संजय राठोड, वीजबिल तोडणी, सचिन वाझे प्रकरणानंतर चॅनेलवर ‘मेळघाटातील कुपोषण’ या विषयावर २४ तास चर्चा रंगू लागली आणि सरकारला खुलासे करता- करता नाकीनऊ येऊ लागले.     

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT