Ajit Pawar sakal
पुणे

...तर कार्यक्रमांचं निमंत्रण स्विकारणार नाही; अजित पवारांनी ठणकावलं!

बारामतीमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona infection) वेगानं वाढायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात प्राथमिक निर्बंध म्हणजे गर्दी टाळणे आणि मास्क लावणे यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एक महत्वाचं भाष्य केलं आहे. "५० पेक्षा अधिक लोक एखाद्या कार्यक्रमाला असतील तर मी त्या कार्यक्रमांना जाणार नाही," असं ते म्हणाले. रविवारी बारामती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCCB) निवडणुकीच्या मतदानासाठी पवार आज बारामतीत होते.

पवार म्हणाले, "सध्या परिस्थितीत सर्वांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. मी आज मत देण्यासाठी इथं आलो आहे. सकाळी आठ वाजताच मी येणार होतो पण सकाळी गर्दी असल्यानं मुद्दाम उशीरा आलो. आजपण माझे बारामतीमध्ये अनेक कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी विचारणार आहे की, तिथं जर ५० च्या वरती लोक असतील तर मी कार्यक्रमाला येणार नाही"

"जी नियमावली आम्ही (मंत्रीमंडळानं) ठरवलेली आहे. त्याच आमच्यासहित सर्वांनीच पालन केलं पाहिजे. जर मीच नियमांचं पालन केलं नाही तर उद्या कुठल्या तोंडानं लोकांना सांगणार आहे की, तुम्ही नियमाचं पालन करा" असंही पवार यावेळी म्हणाले.

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासन सज्ज

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने त्याला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे, अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली. दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे यांसह तिन्ही बेड्स वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व आरोग्य विभागास देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT