Social change through the use of social technology says Dr. Mashelkar
Social change through the use of social technology says Dr. Mashelkar 
पुणे

समाजोपयोगी तंत्रज्ञानातूनच समाजपरिवर्तन - डॉ. माशेलकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनीसुद्धा गटारांच्या सफाईसाठी माणसांचे जीव गमवावे लागणे दुर्दैवी आहे. भविष्याच्या पुढे जाऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा समाजातील शेवटच्या घटकाचे जीवन सुसह्य करणाऱ्या तंत्रज्ञानातूनच समाजपरिवर्तन शक्‍य होईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. 

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित अंजनी माशेलकर सर्वसमावेशक नवकल्पना पुरस्कार समारंभात ते बोलत होते. समारंभाला डॉ. विजय केळकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ खगोलवैज्ञानिक डॉ. गोविंद स्वरूप, जेन रोबोटिक्‍सचे कार्यकारी अधिकारी विमल गोविंद आदी उपस्थित होते. या वर्षीचा पुरस्कार मैला साफ करणाऱ्या "बॅंडीकूट' या रोबोची निर्मिती करणाऱ्या "जेन रोबोटीक्‍सला' प्रदान करण्यात आला.

डॉ. माशेलकर म्हणाले, ""देशामध्ये तीन कोटी बंदिस्त गटारी आहे. त्यांच्या सफाईसाठी लाखो सफाई कामगार स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करतात. त्यातील बहुतांश लोक तीस वर्षांपेक्षा जास्त काळ जगत नाही. गांधीजी स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाची आहे, असे म्हणत. त्यामुळे सफाई कामगारांचे कष्ट सुसह्य करणाऱ्या या रोबोला पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे.'' 

पुणे इंटरनॅशनल सेंटर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्य आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने सामाजिक नवतंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. ग्रामीण, शहरी आणि आदिवासी विभागातून देशभरातील 21 नवतंत्रज्ञ यात सहभागी झाले होते. आपण देशाची वित्तीय तूट बघतो, त्याच प्रमाणे नवतंत्रज्ञानाची तूटसुद्धा बघायला हवी, अशी अपेक्षा डॉ. केळकर यांनी व्यक्त केले. 

सामंजस्य करार 
याच कार्यक्रमात "जेनरोबॉटिक्‍स' आणि "ब्रॅबो' या दोन रोबॉटिक संस्थांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. याद्वारे टाटा समूह "बॅंडीकूट' रोबोच्या उत्पादनात उतरला असून, त्यामुळे भविष्यात अधिकाधिक गटार सफाई कर्मचाऱ्यांची जागा हे रोबो घेऊ शकतील. सफाई कर्मचाऱ्यांनाच सोप्या पद्धतीने बॅंडीकूट रोबो चालवण्याचे प्रशिक्षण जेनरोबोटिक्‍सने दिले आहे. 

"महिन्याला चार ते पाच लोक मैला साफ करताना मृत्युमुखी पडल्याचे आम्ही वाचले. तेव्हाच आम्ही ठरवले की आम्ही जे काही तंत्रज्ञान विकसित करू ते आजच्या गंभीर समस्यांवर चांगला उपाय ठरेल. यातूनच बेंडीकूट जन्माला आला. यामुळे सफाई कामगाराला गटारीत उतरून काम करण्याची गरज नाही. बाहेर उभे राहून तो रोबोचे संचालन करेल.'' 
- विमल गोविंद, शोधकर्ता 

"बेंडीकूट'ची वैशिष्ट्ये 
- गटारीत जाऊन मैला साफ करणारा जगातला पहिला रोबो 
- दुर्गम आणि खोलवरच्या गटारीत मैला सफाईसाठी सक्षम 
- इन्फ्रारेड कॅमेरा, स्वयंचलित हात आदी उपकरणांनी पूर्ण 
- एका दिवसाला दहा गटारी साफ करतो. 
- केरळ सह सहा राज्यांत कार्यान्वित 
- पाणी आणि ज्वलनशील मिथेन वायूचा कोणताही धोका नाही 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT