पुणे

पुणे : मार्केटयार्डात सोशल डिस्टन्सिंगला विक्रेत्यांकडून हरताळ

सकाळवृत्तसेवा

मार्केटयार्ड : गुलटेकडी येथील मार्केटयार्डात गेट नंबर ३ ते गेट नंबर ४ च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला किरकोळ विक्रेते बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकीकडे उत्तम नियोजन करू मार्केटयार्ड नियमित सुरू आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवली जात नाही. तसेच अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या नियोजनाला किरकोळ विक्रेत्यांकडून हरताळ फासला जात आहे. मात्र, याकडे समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे.

मार्केटयार्डात फळे, भाजीपाला विभागाच्या गेट नंबर ३ ते गेट नंबर ४चा रस्ता हा भुसार विभागात येतो. या ठिकाणी भाजीपाला, फळे विकण्यास परवानगी नाही. तसेच भाजीपाला, फळे विभागात किरकोळ विक्रेत्यांना आणि ग्राहकांना बाजारात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याचाच फायदा घेत भुसार बाजारातच किरकोळ विक्रेत्यांनी  समितीच्या आदेशाला झुगारत हात गाडे लावले आहेत. त्यामुळे या परिसरात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीचे ४०० कर्मचारी आणि १२० ते १३० पोलिसांच्या फौजफाट्यात मार्केट यार्ड नियमित सुरू आहे. तरीही या ठिकाणी गर्दी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या प्रमाणे बाजार समितीकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही किरकोळ विक्रेत्यांकडून याला हरताळ फासला जात आहे. याच रस्त्यालगत झोपडपट्टी आहे.

बाजारात भाजीपाला खरेदीसाठी अनेकजण एकाच घरातील दोघे-तिघे जण येत आहेत. त्यामुळे अनेकांना अजूनही कोरोना आजाराबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. यावेळी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT