माजी आमदार आवळे
माजी आमदार आवळे sakal
पुणे

समाजाने कलावंतांचा सन्मान केला पाहिजे - माजी आमदार आवळे

- मोहिनी मोहिते --------

पुणे : समाजाने कलावंतांचा सन्मान केला पाहिजे. समाजातील अभिनेते खेळाडू साहित्यिक यांच्या पाटीवर कौतुकाची थाप मारायला पाहिजे, यामुळे समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी मी कायम तत्पर असून, माझं प्रथम कर्तव्य आहे. आलवसा फाऊंडेशन महापुरुषांचा विचार पसरवत, थोरामोठ्यांचा सन्मान करते, त्यामुळे या संस्थेचं भविष्य उज्वल आहे, असे मत आवळे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी मांडले.

महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त, आलवसा फाऊंडेशन व छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने, आलवसा गौरव सन्मान - २०२२ सोहळा टिंबर मार्केट येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ साहित्यिक संपत जाधव यांना मानाचा फेटा, मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, पाच महापुरुषांच्या प्रतिमा व रोख रक्कम ६८००० रु. देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन आलवसा व छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर भडकवाड यांनी केले होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख राजेश सासगे, इतिहास अभ्यासक सुहास नाईक, संपादक संतोष शिंदे, रामभाऊ कसबे, शांतीलाल मिसाळ, अभिनेत्री आशू सुरपुर, सुजाता शेलार, विनोद शिंदे, मा लक्ष्मण तांदळे, किशनराव जाधव, सुरेश खलसे, अमित मानकर, विशाल कसबे, अंबादास बिनवडे व फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार चन्ने यांनी केले. अभिनेते व मॉडल रोहित शिंदे यांनी जाधव यांचा परिचय देत मानपत्र वाचन केले. इतिहास अभ्यासक सुहास नाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत फाऊंडेशन चे कौतुक केले. संपत जाधव हे मला वडिलांप्रमाणे असून, त्यांचा सन्मान होताना मला मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या कडून मला प्रेरणा मिळते व ते मला समाजकार्याचे धडे देत असतात, अशा भावना सुजाता शेलार यांनी व्यक्त केल्या.

आलवसा फाऊंडेशन जाती धर्मा पलीकडील संघटन असून, सर्व समाजातील लोक या संस्थेत पदाधिकारी म्हणून समाजकार्य करतात. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण या विषयी विशेष कार्य करताना, महापुरुषांच्या विचारधारेचा प्रसार करण्याचा प्रयत्न असतो. ही विचारधारा समाजात रुजविण्याचा जे लोक प्रयत्न करतात, त्यांचा योग्य सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहॆ, असे संघटनेचे मत असून यातीलच एक थोर कलावंत, अभिनेते आणि जेष्ठ साहित्यिक संपत जाधव यांचे जीवन प्रेरणादायी आहे, त्यांचा सन्मान केल्याने संस्थेची सामाजिक उंची वाढली, असे मत शंकर भडकवाड यांनी मांडले.

सन्माना ला उत्तर देताना जाधव म्हणाले की, जगणं आणि साहित्य या नाण्याच्या दोन बाजू आहेत.अभिव्यक्ती जेव्हां व्यक्त केली जाते मग ती कलावंताची असेल, साहित्यिकाची असेल, हे त्याच्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. या सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली असून अधीक काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली आहॆ. तसेच हे फाऊंडेशन ही समाजातील वैचारिक संस्था असून, माझे कुटुंब आहे, हा सन्मान माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण असून ही. संस्था माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, अशा भावना संपत जाधव यांनी मांडल्या.

कार्यक्रमाचे नियोजन सुमित शेलार यांनी केले. सूत्रसंचालन आहन देवाडीगा यांनी केले तर मान्यवरांचे आभार नितीन कांबळे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT