वास्तव वेध
प्रभाग १६
PNE26W65664
सोलापूर : महाराष्ट्र गादी सेंटर परिसरात ड्रेनेज लाइनच्या कामासाठी आणलेले सिमेंटचे पाइप.
ड्रेनेजच्या कामांना सुरुवात; पाणीप्रश्न कायम
मौलाली चौक, महाराष्ट्र गादी सेंटर परिसरात कामे सुरू; अंतर्गत रस्ते, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : प्रभाग १६ मधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून नागरिकांच्या तक्रारी कायम असतानाच काही भागांत विकासकामांना सुरुवात झाली आहे. नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे यांच्या भांडवली निधीतून मौलाली चौक आणि महाराष्ट्र गादी सेंटर परिसरात ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, प्रभागातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा आणि खराब रस्त्यांचे प्रश्न अद्याप कायम आहेत.
मौलाली चौक व महाराष्ट्र गादी सेंटर येथील ड्रेनेज कामांचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, विवेक इंगळे, दिनेश म्हेत्रे, रमेश फुले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
प्रभागातील कामांसाठी नगरसेवकांनी महापालिकेकडे प्रस्ताव दिले आहेत. काही कामे सुरू झाली असली, तरी इतर कामांना मंजुरी आणि निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सुरू झालेल्या कामांसोबतच प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
----------------------
कोट
प्रभागातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा, तुंबलेली ड्रेनेज आणि खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडे कामे सुचविली होती. त्यापैकी भांडवली निधीतून मौलाली चौक व महाराष्ट्र गादी सेंटर परिसरातील ड्रेनेज लाइनची कामे सुरू केली आहेत. उर्वरित कामांसाठीही पाठपुरावा सुरू आहे.
- प्रा. नरसिंह आसादे, नगरसेवक
प्रभाग क्रमांक १६ मधील समस्यांसाठी यशवंत गव्हाणे (९६०४००३६७५) यांच्याशी संपर्क करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.