पुणे

ड्राय पोर्ट रचना

CD

उभारणी ड्रायपोर्टची : भाग - १

PNE26W40085
ड्राय पोर्टची कार्यपद्धती दाखवणारी आकृती

सोलापुरात ड्राय पोर्टसाठी जागाशोध सुरू; उद्योगमंत्र्यांचे निर्देश
३०० किमी परिसरातील उद्योगांना फायदा; निर्यात खर्च आणि वेळेत बचत

प्रकाश सनपूरकर ः सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : सोलापुरातील बहुप्रतीक्षित ड्राय पोर्ट प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) सोलापूर येथे ड्राय पोर्टसाठी तातडीने जागा शोधण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोलापूरसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि सीमावर्ती कर्नाटक-तेलंगणा राज्यांतील उद्योगांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०१८ मध्ये सोलापूरसाठी ड्राय पोर्टची घोषणा केली होती. त्यानंतर स्थानिक उद्योजक, व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. आमदार सुभाष देशमुख यांनीही हा विषय विविध स्तरांवर लावून धरला होता. मागील पंधरवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीला जागा निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिल्याने प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागण्याबाबत आशावाद निर्माण झाला आहे.
सोलापूर येथे ड्राय पोर्ट उभारल्यास सोलापूर केंद्रस्थानी ठेवून सुमारे ३०० किलोमीटर परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना त्याचा लाभ होणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमावर्ती कर्नाटक व तेलंगणा राज्यांतील उद्योगांसाठीही ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. सध्या राज्यात जालना येथे अशा प्रकारचे ड्राय पोर्ट कार्यरत आहे.

ड्राय पोर्ट म्हणजे काय?
ड्राय पोर्ट म्हणजे अंतर्देशीय कंटेनर डेपो (आयसीडी). समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या भागांतील निर्यातदारांसाठी येथेच सीमाशुल्क, तपासणी आणि निर्यातीशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यानंतर कंटेनर रेल्वे किंवा महामार्गाद्वारे थेट बंदरात पाठविले जातात. त्यामुळे बंदरापर्यंतचा वाहतूक खर्च, वेळ आणि लॉजिस्टिकवरील खर्च कमी होतो. सोलापुरातील ड्राय पोर्टची जोडणी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टशी रेल्वे व महामार्गाद्वारे होण्याची अपेक्षा आहे.
........
चौकट
ड्राय पोर्टमधील प्रमुख विभाग अन् कार्ये
- कंटेनर यार्ड व स्टॅकिंग एरिया : आयात-निर्यातीचे कंटेनर्स साठवणूक
- रीफर पॉईंट्स : नाशवंत मालासाठी वापरल्या जाणाऱ्या रेफ्रिजरेटेड कंटेनर्ससाठी पॉवर सॉकेट्स.
- हँडलिंग इक्विपमेंट्स : कंटेनर्सची चढ-उतार करण्याची यंत्रसामुग्री
- कस्टम्स व क्लिअरन्स झोन : सीमाशुल्क विभागाचा तपासणी प्रक्रिया केंद्र.
- स्कॅनिंग स्टेशन : कंटेनर न उघडता आतील मालाची अचूक तपासणी
- लॅब विभाग : कृषी माल, अन्नपदार्थांसाठी फायटोसॅनिटरी व क्वारंटाईन प्रयोगशाळा.
- शीतगृहे : शेतमाल आणि अन्नप्रक्रिया मालासाठी आधुनिक कोल्ड स्टोअरेज.
.........
कोट PNE26W39916
- सोलापूर हे देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रांपैकी एक आहे. ड्राय पोर्टमुळे राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी मिळेल. याशिवाय केळी, डाळिंब, द्राक्षे, साखर, आणि ज्वारी यांसारख्या कृषी उत्पादकांना याचा प्रचंड फायदा होईल.
- अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ
.......
कोट
PNE26W40102
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१८ मध्ये ड्राय पोर्टची घोषणा केली होती. तेव्हापासून सर्व लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटना याच्या उभारणीसाठी आग्रही आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या कनेक्टिव्हिटीमुळे ड्राय पोर्टच्या माध्यमातून परिसरातील ३०० किलोमीटरच्या त्रिज्येतील उद्योग व निर्यातदारांना खूप मोठा दिलासा मिळेल.
- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT