पुणे

शहर गुन्हेगारी

CD

घरासमोरील दुचाकी
चोरट्याने चोरली
सोलापूर : घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच १३, बीएल ५८४९) चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद रमाकांत लक्ष्मीनारायण कुडक्याल (रा. राघवेंद्र टॉवर, ७० फूट रोड, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसांत दिली आहे. २३ जुलैला सायंकाळी सात ते पावणेआठच्या सुमारास दुचाकी चोरी झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार गावडे तपास करीत आहेत.
-----------
‘मेव्हणीला बोलू देत
नाही’ म्हणून मारहाण
सोलापूर : ‘तू माझ्या मेव्हणीला माझ्यासोबत का बोलू देत नाही’ असे म्हणून आष्टिक बिराजदार (रा. आरटीओ कार्यालयाजवळ, सोलापूर) याने फिर्यादी योगेश अशोक दोडमनी (रा. सोरेगाव) यास उद्धव नगरात गाडी अडवून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याने चाकूने उजव्या डोळ्यावर वार करून जखमी केल्याची फिर्याद योगेश दोडमनी याने विजापूर नाका पोलिसांत दिली. १३ ऑगस्ट रोजी सव्वा दहाच्या सुमारास आष्टिक व त्याच्यासोबत आलेल्या तिघांनी मिळून उद्धव नगरातील मोकळ्या मैदानाजवळ मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस हवालदार फुलारी तपास करीत आहेत.
------------
‘दोन हजार दे नाहीतर
मारतो’ म्हणून मारहाण
सोलापूर : येथील कल्याण नगरातील गिरिजा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडजवळ थांबलेल्या अनिल अंबादास सावंत (वय ३४, रा. कल्याण नगर, सोलापूर) यास प्रशांत गरडे (रा. कल्याण नगर भाग-२) यास मारहाण केली. ‘दोन हजार रुपये दे नाहीतर मारतो’ असे म्हणून त्याने लाकडी फळीने मारले. डाव्या बरगडीवर देखील त्याने मारहाण केली, अशी फिर्याद प्रशांत गरडे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. १३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही मारहाण झाली. पोलिस हवालदार फुलारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

Nag Panchami 2026: भावासाठी उपवास,जमीन न खोदणे ते चुलीचा नियम; जाणून घ्या नागपंचमीला पाळल्या जाणाऱ्या प्रथा!

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

SCROLL FOR NEXT