चार आरोग्य उपकेंद्रांना ‘एनक्यूएएस’ मानांकन
--
सोलापूरला मानांकित ‘आयुष्मान आरोग्य मंदिरां’ची संख्या १४ वर
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात’ (एनक्यूएएस) सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणखी चार आरोग्य उपकेंद्रांना मानांकन मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘एनक्यूएएस’ प्रमाणपत्र प्राप्त आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या आता १४ झाली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विजोरी, रातंजन, श्रीपत पिंपरी आणि लिंबीचिचोळी या चार आयुष्मान आरोग्य उपकेंद्रांना मानांकन मिळाले. आरोग्यसेवेची गुणवत्ता, रुग्णकेंद्रित सेवा, सुरक्षितता, स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रभावी सेवा वितरण आदी निकषांच्या आधारे हे मानांकन दिले जाते.
या मानांकनामुळे उपकेंद्र स्तरावरील आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होणार आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचे व्यवस्थापन, रुग्ण सुरक्षा, संसर्ग नियंत्रण, नोंदींचे अद्ययावत व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या समाधानावर विशेष भर दिला जाणार आहे.
मानांकन प्राप्त आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून विशेष प्रोत्साहन निधी मिळणार आहे. या निधीचा वापर पायाभूत सुविधा बळकट करणे आणि आवश्यक आधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
---
प्रतिक्रिया
‘‘जिल्ह्यात आतापर्यंत १४ आरोग्य संस्थांना ‘एनक्यूएएस’ मानांकन मिळाले आहे. येत्या काळात जिल्ह्यातील उर्वरित सर्व आरोग्य संस्थांना राष्ट्रीय मानांकन मिळवून देणे आणि सर्वसामान्यांना दर्जेदार व सुरक्षित आरोग्यसेवा पुरविणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.’’
- कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.