पुणे

मतदान केंद्रात वाढ

CD

जिल्ह्यात मतदार घटले तरीही मतदान केंद्रांत वाढ शक्य

एसआयआर : जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर मुख्य निवडणूक अधिकारी घेणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या एसआयआर मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ६ लाख २० हजार ३६१ मतदार कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या कमी झाली तरी मतदान केंद्रांच्या संख्येत किंचितशी वाढ होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना ही वाढ होण्याची शक्यता असून, यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भारत निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या ३९ लाख ४१ हजार ९५ मतदार आहेत. एसआयआर मोहिमेत ६ लाख २० हजार ३६१ मतदारांचे गणनापत्रक मिळाले नाही. त्यामध्ये १ लाख ७ हजार ६५० मतदार मयत असल्याचे समोर आले आहे. बीएलओंकडून घरोघरी जाऊन तपासणी करताना तिन्ही वेळा गैरहजर आढळलेल्या मतदारांची संख्या १ लाख ३२ हजार ४६७ आहे. स्थलांतरित झालेल्या मतदारांची संख्या २ लाख १० हजार १६३, तर सध्याच्या मतदार यादीत १ लाख ५ हजार ६८४ मतदार दुबार असल्याचे समोर आले आहे.
एसआयआरमध्ये गणनापत्रक भरण्याचे काम पूर्ण झाले असून, आता जिल्ह्यातील ३ हजार ७२३ मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. यामध्ये भौगोलिक सलगता, सध्याच्या मतदान केंद्राच्या इमारतीची स्थिती यांचा विचार केला जाणार आहे. आवश्यकता असल्यास मतदान केंद्र दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित केले जाईल. मतदाराच्या घरापासून दोन किलोमीटरच्या मर्यादेत मतदान केंद्र असावे, तसेच एका इमारतीमधील मतदारांचा समावेश शक्यतो एकाच मतदान केंद्रावर असावा, याची दक्षता घेतली जाणार आहे.
२०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आल्यामुळे मतदारांना त्रास झाला होता. एसआयआरमध्ये ही बाबही विचारात घेतली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून सोलापूरचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच मतदान केंद्रांमधील नवे बदल स्पष्ट होतील.

एका केंद्रावर १२०० मतदार
वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी १२०० मतदारांचा समावेश असावा, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी मतदारांची संख्या १५०० ते १८०० एवढी आहे. त्यामुळे मतदानासाठी वेळ लागणे, मतदानाची आकडेवारी संकलित करताना अडचणी येणे यासह अनेक प्रश्न उद्‍भवत आहेत. आता मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणात १२०० मतदारसंख्येचा निकष तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील अनेक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT