पुणे

प्रभाग० १२

CD

प्रभाग १२
............
प्रभाग समस्या
---
PNE26W18250
सोलापूर : विजय नगरातील मासन किराणा दुकान ते गणेरी यांचे घर या रस्त्याला १० लाखांचा निधी मंजूर झाल्यावर अजूनही ‘जैसे थे’ असलेला रस्ता.
.........
PNE26W18271
सोलापूर : सुनील नगरातील खड्ड्यांत अडकलेला रस्ता.
...........
सुनीलनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा; कचरा संकलनही विस्कळित
औद्योगिक वसाहतीच्या रस्ते विकासासाठी ५६ कोटींची घोषणा; विकासकामांकडे उद्योजकांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : प्रभाग क्रमांक १२ मधील सुनील नगरसह अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कचरा संकलन व्यवस्थेतही बेशिस्त वाढू लागली आहे. दरम्यान, औद्योगिक वसाहतीतील रस्ते विकासामुळे या प्रभागाचा मोठा कायापालट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रभागात अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत, सुनीलनगर, अंबिकानगर आदी भागांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा केली होती. या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
विमानसेवा सुरू झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार व खरेदीदार सोलापुरात येण्यास इच्छुक आहेत. मात्र, खराब रस्त्यांमुळे उद्योजकांना त्यांना येथे बोलाविण्यात अडचणी येत आहेत. शहराच्या औद्योगिक विकासाचा चेहरा या वसाहतीच्या विकासावर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
---
आमदारांकडून विकासकामे
आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. इस्कॉन मंदिर रस्ता, राजमाता गार्डन रस्ता, वज्रेश्वर नगर आदी भागांतील रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असून, कामे अंतिम टप्प्यात आहेत.
............
नागरिक म्हणतात...
कोट
PNE26W18273
आमच्या नगरात सात ते आठ दिवसाला पाणी येते, ते पण अगदी कमी दाबाने. मोटार लावून देखील पाण्याची अडचण आहे. घंटागाडी देखील आठ ते दहा दिवस येत नाही. तक्रार केली तर आमची तक्रार कशाला करता म्हणून आम्हालाच दिला जातो.
- नरेश आंबट, रहिवासी, सुनीलनगर
.........
नगरसेवक म्हणतात
कोट
क्र. :
लोकांच्या पाण्याच्या तक्रारी आहेत. त्या आम्ही सोडवत आहोत. अनेक भागांत पुरेसे पाणी पोचत नाही. हद्दवाढचा भाग असल्याने समांतर जलवाहिनी प्रकल्पात प्रश्न सुटतील. आमदार देवेंद्र कोठे यांच्या निधीतून विकासकामे सुरू आहेत.
- अर्चना वडनाल, नगरसेविका, प्रभाग १२
.......
कोट
क्र. :
‘लोकमंगल’जवळील नाल्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पुढील काळात पावसाच्या पाण्याचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. इस्कॉन मंदिर रस्त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी निधी दिला आहे.
- सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक, प्रभाग क्र. १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT