solid waste management, roads, drinking water and households in villages in the district covered by PMRDA 
पुणे

घनकचरा, रस्ते, पाणी अन्‌ घरकुलांवर भर; गाव विकास आराखडे करणार

गजेंद्र बडे

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) समावेश झालेल्या जिल्ह्यातील गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पिण्याचे पाणी आणि घरकुलांवर अधिक भर दिला जाणार आहे. याबाबतचे गावनिहाय विकास आराखडे पीएमआरडीए तयार करणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आवश्‍यक ती माहिती (इनपुट) उपलब्ध करून देणार आहे. या दोन्ही संस्था संयुक्तपणे गावांच्या विकासाला प्राधान्य देणार आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी सर्वसमावेशक अशी एकच बांधकाम नियमावली (कॉमन डीसी रुल) करण्यासंदर्भात दोन्ही संस्थांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. 

ग्रामपंचायत ही स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे सध्या पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत ग्रामपंचायत आणि पीएमआरडीए असे दोन स्वतंत्र बांधकाम नियमावल्या आहेत. यामुळे दोन वेगळेवेगळे नियमांचे बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. यावर मार्ग कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सर्वसमावेशक एकच बांधकाम नियमावली (कॉमन डी. सी. रुल) असणे आवश्‍यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पीएमआरडीएला कळवले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, लोकवस्त्यांसाठी घरकुल बांधणे, गावा-गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण करणे आणि रस्ते बांधणी या प्रमुख चार मुद्यांच्या गावनिहाय विकास आराखड्यात समावेश करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा आणि सरकारी जागांवर शाळा, अंगणवाड्यांसाठी इमारती बांधण्याची तरतूद या संभाव्य आराखड्यामध्ये करण्याचे मागणी जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 608 म्हणजेच सुमारे निम्म्या ग्रामपंचायती या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्क अनुदानातील निम्मी रक्कम ही पीएमआरडीएकडे वर्ग करावी लागत आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये करावयाच्या संभाव्य विकासकामांचा गावनिहाय आराखडा तयार करावा आणि त्यासाठी जिल्हा परिषदेने विकासकामे सुचवावित, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानुसार हे आराखडे करण्यात येत आहेत.

सावधान! Redmi Mi7 प्रो स्वस्तात घेण्याचा फंडा पडला महागात; सायबर चोरट्यांनी गंडवलं 

''कचरा व्यवस्थापनासाठी क्‍लस्टर घनकचरा व्यवस्थापनासाठी गावनिहाय प्रकल्प उभारण्याऐवजी चा-पाच गावांसाठी मिळून प्रत्येकी एक क्‍लस्टर करावे, अशी सूचना पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला केली आहे. त्यानुसार रुग्णवाहिकांच्या धरतीवर कचरा व्यवस्थापनासाठी चार किंवा पाच गावांसाठी घनकचरा व्यवस्थापनासाठीचे प्रकल्प क्‍लस्टर पद्धतीने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. कोट पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील गावांचे विकास आराखडे पीएमआरडीएमार्फत केले जाणार आहेत. त्या आराखड्यामध्ये कोणत्या बाबींना प्राधान्य असावे, याचे इनपुट जिल्हा परिषद देणार आहे. विशेषतः कचरा व्यवस्थापन, घरकुल, रस्ते आणि पिण्याचे पाणी या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.''
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT