Sugarcane
Sugarcane 
पुणे

‘सोमेश्वर’ने ३४०० रुपये भाव द्यावा - सतीश काकडे

सकाळवृत्तसेवा

सोमेश्वरनगर - सोमेश्वर साखर कारखान्याच्या साखरेचे मूल्यांकन ३४०९ रुपये प्रतिक्विंटल आहे. ४३ कोटी रुपये इतकी मागील हंगामाची शिल्लक आहे आणि उपपदार्थांतूनही कोट्यवधी मिळाले आहेत. यामुळे ‘सोमेश्वर’ने २०१७-१८ च्या गळीत हंगामाचा अंतिम भाव ३४०० रुपये प्रतिटन द्यावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे. तसेच भावासाठी खुली चर्चा करण्याचे आव्हानही संचालक मंडळास दिले आहे.

अल्कोहोल, इथेनॉलमधूनही रोख रकमा मिळाल्या आहेत. २०१६-१७ च्या हंगामात शिल्लक साखरसाठ्याचे मूल्यांकन कमी केले होते. त्यामुळे १७-१८ च्या हंगामात ४३ कोटी जादा उपलब्ध आहेत. कारखान्याचा दर ३४०० रुपये बसत असून शेतकऱ्यांना आणखी ७५८ रुपये प्रतिटन मिळत आहेत. त्यापैकी २०० रुपये त्वरित द्यावेत आणि उर्वरित रक्कम देऊन दिवाळी गोड करावी. मार्च २०१८ नंतर साखरेचे घसरलेले दर किंवा साखरेवर मिळणारी कमी उचल याचा अंतिम दर देताना संबंध येत नाही, असे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे. 

अध्यक्ष अन्य कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही असे सांगतात. पण सोमेश्वरने मागील पाच वर्षे माळेगावच्या तुलनेत प्रतिटन ८०२ रुपये इतका कमी भाव दिला होता हे विसरून अन्य कारखान्यांशी तुलना करू नये. सोमेश्वर आता कर्जमुक्त झाला आहे. फक्त साखर विकास फंडाचे व सॉफ्ट लोनचे कमी व्याजदराचे हप्ते आहेत. त्यासाठीही १५ कोटी रुपये भागभांडवल व घसारा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे ‘माळेगावपेक्षा जास्त भाव देणार’ हा दिलेला शब्द अध्यक्षांनी पाळावा व सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कारभार करावा, अशी टीकाही काकडे यांनी केली. 

‘यंदा गेटकेन आणू नये’
कार्यक्षेत्रात जादा ऊस असल्याचे संचालक मंडळ सांगते. त्यामुळे राज्य सरकारने संमती दिल्याप्रमाणे १ ऑक्‍टोबरपासून कारखाने सुरू करावेत. मागील हंगामात सुरवातीला गेटकेन आणल्याने सभासदांच्या तोडी लांबल्या आणि वजनात घट झाली. या वेळी तशी चूक न करता संपूर्ण सभासदांचेच गाळप करावे, असे आवाहन शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT