पुणे

सोमेश्वर कारखान्याकडून राज्यातील सर्वोच्च दर

CD

सोमेश्वरनगर, ता. १४ : सोमेश्वर साखर कारखान्याने २०२५-२६ या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी तब्बल ३८०० रुपये प्रतिटन, असा महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या इतिहासातील आजवरचा सर्वोच्च अंतिम दर आज जाहीर केला. ही रक्कम एफआरपीपेक्षा ५१५ रुपये अधिक आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ज्यांचा ऊस तुटलाय, अशा शेतकऱ्यांना तर अनुदानासह ३९०० व ४००० रुपये प्रतिटन, असा विक्रमी दर मिळणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ताळेबंदानुसार ३८०० रुपये प्रतिटन, असा अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने सोमेश्वरने स्वतःचा २०२३-२४ हंगामाचा ३५७१ रुपये प्रतिटनाचा विक्रम मागे टाकला आहे. तसेच ''सोमेश्वर''ने सलग नवव्या वर्षी तीन हजारांपेक्षा अधिकचा दर दिला आहे.
सोमेश्वरची एफआरपी प्रतिटन ३२८५ रुपये असून, शेतकऱ्यांना पहिली उचल ३३०० रुपये अदा केलेले आहेत. आता उर्वरित प्रतिटन ५०० रुपये दिवाळीपूर्वी मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात कोल्हापूरच्या ‘भोगावती’ने ३६५३ रुपये (२०२५-२६), तर ‘माळेगाव’ने ३६३६ रुपये (२०२३-२४) प्रतिटन असे सर्वोच्च दर दिले होते. कोल्हापूर, सांगलीतील कारखान्यांपेक्षा अर्धा ते एक टक्का साखर उतारा कमी असताना ‘सोमेश्वर’ने बाजी मारली आहे.

१२.२७ टक्के साखर उतारा
‘सोमेश्वर’ने सरत्या हंगामात १२ लाख ९८ हजार टन गाळप करत १२.२७ टक्के साखर उतारा राखत १५ लाख ५७ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली होती. १२ कोटी ५३ लाख वीजनिर्मिती करत ८ कोटी ३६ लाख युनिटची विक्री केली आहे. तसेच, ८६ लाख लिटर अल्कोहोल व ४३ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.

आमचे दिवंगत नेते अजितदादा यांच्या कडक शिस्तीमुळे राज्यातील सर्वोच्च दर देऊ शकलो. त्यांच्या स्मृतींना हा निर्णय अर्पण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाची धोरणे, कामगार-अधिकारी यांचे उत्तम नियोजन, वाहतूकदार-तोडकरी यांचे सहकार्य आणि सभासदांनी ''सोमेश्वरलाच ऊस घालणार'' हा दाखवलेला विश्वास यामुळे चांगले काम करता आले, याचे समाधान आहे.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्‍वर साखर कारखाना

सर्वोच्च दराची कारणे
- मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल स्टॉपेजेस ०.०६ टक्के
- उत्तम लागवड व तोडणी नियोजन
- गाळपक्षमतेचा १११ टक्के वापर
- साखर उत्पादन खर्च आणि एकूण उत्पादन खर्च माफक
- कर्जांवरील व्याजखर्चावर नियंत्रण
- शेतकऱ्यांकडून दर्जेदार ऊसपुरवठा
- उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता

सोमेश्वरचे पाच वर्षांतील दर (प्रतिटन)
हंगाम एफआरपी अंतिम दर एफआरपीपेक्षा जादा
२०२१-२२ २८०२.. ३०२०.. २१८
२०२२-२३ २८५०.. ३३५०.. ५००
२०२३-२४ २८७४.. ३५७१.. ६९७
२०२४-२५ ३१७३.. ३४००.. २२७
२०२५-२६ ३२८५.. ३८००.. ५१५

गुजरातप्रमाणे प्रतिटन चार हजार रुपये
''सोमेश्वर''ने फेब्रुवारी, मार्चमध्ये विलंबाने तुटणाऱ्या उसाला अनुक्रमे १०० व २०० रुपये प्रतिटन, असे अधिकचे प्रोत्साहन अनुदान दिले होते. यामुळे फेब्रुवारीत ऊस तुटलेल्या शेतकऱ्यांना ३९०० रूपये, तर मार्चमधल्याना तब्बल ४००० रुपये प्रतिटन, असा गुजरातच्या धर्तीवर विक्रमी दर मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

१५ ऑगस्टच्या तारखेला होता ज्योतिषांचा विरोध, मग नेहरूंनी काढला तोडगा.. वाचा नेमका किस्सा...

SCROLL FOR NEXT