son help mother after father death Khadakwasla canal drowning death Kirkatwadi  sakal
पुणे

खडकवासला कालव्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाचा बुडून मृत्यु

दुसऱ्या दिवशी आढळला खडकवासला कालव्यात मृतदेह

निलेश बोरुडे

किरकटवाडी : दोन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी खडकवासला कालव्यात गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडालेल्या मयुर बापु मरगळे (वय 13, रा गल्ली नं 8, शिवनगर किरकटवाडी) याचा आज शिंदेवस्ती, हडपसर येथे कालव्यात मृतदेह आढळून आला आहे. मनमिळावू व कष्टाळू मयूर अचानक गेल्याने मरगळे कुटुंबासह खडकवासला व किरकटवाडी परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

पाच वर्षांपूर्वी मयुर अवघा आठ वर्षांचा असताना त्याच्या वडीलांचे अपघाती निधन झाले होते. कोवळ्या वयात परिस्थिने अंगात समजूतदारपणा आलेल्या मयुरने तेव्हापासूनच आई व आजोबांना मदत व्हावी म्हणून सकाळी लवकर उठून पेपर टाकण्याचे काम सुरू केले. तसेच आजोबांना पिठाच्या गिरणीवरही मयुर मदत करत होता. काम करुन तो शिकत होता व अभ्यासातही हुशार होता. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मयुरचे शाळेतील वर्तनही अत्यंत नम्रतेचे होते. मयुरच्या स्वभावगुणांमुळे गल्लीतील रहिवासीही त्याचे कौतुक करत असायचे.

दि. 13 जून रोजी तो पोहण्यासाठी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला सुमारे पाचशे मीटर अंतरावर कालव्यात उतरला. सोबत त्याचा लहान भाऊ व आणखी एक मित्र होता. पोहता येत नसल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणात मयुर दिसेनासा झाला. घाबरलेल्या मित्राने मयुरच्या आजोबांना याबाबत माहिती दिल्यानंतर आजोबांनी रडत रडत हवेली पोलीस ठाणे गाठले. दोन दिवस अग्निशमन दलाचे जवान व हवेली पोलीसांनी शोध घेतला परंतु मयुर सापडला नाही. आज अखेर हडपसर जवळील शिंदेवस्ती येथे मयुरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात मयुरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाला सावरण्यासाठी धडपडणाऱ्या कोवळ्या मयुरचे अकाली जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

IND vs AFG, Viral Video: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकलीच, पण मनंही जिंकली; अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं अन्...

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Marathi News Live Updates : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा बंगल्यावर घेतले गणरायाचे दर्शन

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT