पुणे

सोनोरीत अवैध स्फोटक साठा जप्त

CD

सासवड, ता. १८ : पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून अवैध स्फोटक साठा आणि तीन वाहने असा एकूण ३० लाख ६७ हजार ४३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हा साठा केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​
राजेंद्रकुमार रामदयाल बाहेती (रा. तावरे कॉलनी, पुणे) आणि सागर हिंमत मंडल (वय ३०, रा. चऱ्होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस नाईक सचिन किवळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोनोरी येथील गट क्रमांक २६० मध्ये ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास संशयास्पद वाहनांची झडती घेतली असता, आयशर ट्रक (क्र. आरजे ०६ जीबी ९८३०) आणि बोलेरो पिकअप (क्र. एमएच १२ झेडई ४५१०)मध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या व ''डेक्कन पॉवर''चे बॉक्स आढळले. यामध्ये १३ लाख १९ हजार रुपयांचा आयशर ट्रक व स्फोटके, ७ लाख १० हजार रुपयांची बोलेरो पिकअप आणि १० लाख ३७ हजार रुपयांचा अन्य एक ट्रक असा एकूण ३० लाख ६७ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT