PTK26B01033
नांदोरे (ता. पंढरपूर) : येथील एस. पी. पब्लिक स्कूलच्या सैनिक स्कूल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे व इतर.
---
सैनिक स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत
एस.पी. पब्लिक स्कूलचे यश
पाचवी अन् आठवीतील सर्वच विद्यार्थी पात्र
सकाळ वृत्तसेवा
पटवर्धन कुरोली, ता. १ : शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत नांदोरे (ता. पंढरपूर) येथील एस. पी. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. परीक्षेसाठी इयत्ता पाचवीतील १५ व इयत्ता आठवीतील ६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच विद्यार्थी पात्र ठरले.
इयत्ता पाचवीमध्ये अनिरुद्ध गायकवाड (३०० पैकी २६२), ऋतुजा सातुरे (२५३), वंश कुरणावळ (२३७), आरोही गायकवाड (२३५), ओमराज कदम (२२४), कार्तिकी कदम (२२१), आयुष कानगुडे (२०६), सार्थक जवळेकर (२०७), निवेदिता पेटकर (२०६), अबुबकर आतार (१७९), विघ्नेश व्यवहारे (१७९), अथर्व कदम (१६९), प्रज्वल तळेकर (१६४), सृष्टी पाटील (१५४) व देवराज व्यवहारे (१२४) यांनी यश मिळवले.
इयत्ता आठवीमध्ये वेदांत वलगे (४०० पैकी ३३६), पूजा सुतार (२७०), पायल सुरवसे (२४८), सुहाना मुलाणी (२३८), सिद्धांत भिंगारे (२२६) व प्रणाली भोसले (२१०) यांनी उल्लेखनीय गुण मिळवले.
या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर व माध्यमिक विभागप्रमुख साईनाथ कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना सचिन डोके, ज्योत्स्ना सुरवसे, स्मिता पांढरे, माऊली मोकळे व सदानंद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.