Amitesh Kumar and Murlidhar Mohol Sakal
पुणे

Pune News : कोरोनात व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग

कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील काही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील काही व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील काही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधित व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याची अंमलबजावणी सुरु असून, न्यायालयीन प्रक्रिया पोलिसांकडून केली जात आहे.

या प्रक्रियेला गती देण्याबाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका आणि भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मंगळवारी भेट घेतली. त्यावर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया या वेळी उपस्थित होते.

या संदर्भात मोहोळ म्हणाले, ‘कोरोनाच्या कालावधीत व्यापारी प्रशासनाला सहकार्य करीत होते. तरीही तत्कालीन सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देत गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पूर्तता लवकरच होत आहे.’

ॲड. रांका म्हणाले, ‘राज्य सरकारने गुन्हे मागे घेण्याची स्वागतार्ह घोषणा केली. त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून, या प्रक्रियेला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा पोलिस आयुक्तांशी झाली आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT