पुणे

गुणवत्तावान विद्यार्थ्यांचा शोध

CD

रिमांड होममध्ये ‘प्रकल्प शक्ती’ उपक्रम
सातारा, ता. २१ : विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रोग्राम अँड टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रिमांड होममध्ये ‘प्रकल्प शक्ती’अंतर्गत विद्यार्थ्यांची आधुनिक पद्धतीने फिटनेस चाचणी घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सभापती शंकर किर्दत, महिला व बालकल्याणच्या सभापती मोनिका घोरपडे, नियोजन सभापती अशोक शेडगे, स्थायी समिती सदस्य सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेविका अनिता फरांदे व रीना भणगे आदी उपस्थित होते. या चाचणीत विद्यार्थ्यांची उंची, वजन, स्टँडिंग ब्रॉड जंप, काऊंटर मूव्हमेंट जंप, ३० मीटर धावणे आदी विविध बाबींची तपासणी केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची अचूक नोंद घेण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेचा वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होते. त्याआधारे भविष्यातील क्रीडा विकासाचे नियोजन करता येणे शक्य होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य व क्रीडा यांना प्रोत्साहन देणे. प्रत्येक विद्यार्थ्याची फिटनेस क्षमता समजून घेणे, क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना नियोजनबद्ध प्रशिक्षणाची दिशा देणे या उपक्रमाचा उद्देश असल्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी नमूद केले.

----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

SCROLL FOR NEXT