scholarship sakal
पुणे

पुणे : अडीचशे खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती

नवीन क्रीडा धोरणानुसार ही शिष्यवृत्ती दिली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेतर्फे (Pune corporation) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त २५५ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. नवीन क्रीडा धोरणानुसार ही शिष्यवृत्ती (Scholarships) दिली जात आहे. यासाठी १ कोटी ३२ लाख ५७ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यात देण्यात आली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant rasane) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Sports Scholarships 250 players Pune corporation)

२०१३ मध्ये महापालिकेने क्रीडा धोरण तयार केले होते, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने दोन वर्षांपूर्वी सुधारित क्रीडा धोरणास मंजूर केले या नवीन धोरणामध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची तरतूद केली आहे. त्यासाठी २०१४ ते २०१८ या काळातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अर्ज महापालिका प्रशासनाने मागितले होते. त्यामध्ये ३८ खेळाडू पात्र झाले. मात्र, त्यानंतर १९७० पासूनचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनाही ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार अर्ज मागविले असता या अर्जांची संख्या २५७ इतकी झाली, त्यामध्ये २५५ जण पात्र ठरले आहेत. या प्रत्येकास ५० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

विसर्जनासाठी २०० टन अमोनिअम बायकार्बोनेटची खरेदी

गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेश मूर्तींचे प्रमाण खूप असते, पण गणेश विसर्जन करताना या मुर्ती पाण्यात विरघळत नसल्याने जलप्रदूषणात वाढ होत आहे. विसर्जनासाठी हौद आणि टाक्यांची व्यवस्था केली जाते. तेथे मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या विरघळाव्यात यासाठी अमोनिअम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. गेल्या वर्षी १५० टन अमोनिअम बायकार्बोनेटची खरेदी केले होते. पण यंदा शहराच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट झाल्याने राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड कडून २०० टन अमोनिअम बायकार्बोनेट खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ४९ लाख ५६ हजाराचा खर्च अपेक्षीत आहे, असे असे रासने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT