Daund News : ट्रॅाली खाली सापडून SRPF जवानाचा मृत्यू sakal media
पुणे

Daund News : ट्रॅाली खाली सापडून SRPF जवानाचा मृत्यू

शहरातून जाणाऱ्या नगर - दौंड - कुरकुंभ - फलटण राष्ट्रीय महामार्गावर २ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता हा अपघात झाला

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात ट्रॅक्टर - ट्रॅालींचे चाक डोक्यावरून गेल्याने राज्य राखीव पोलिस दलातील एका जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॅालींमध्ये क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक केली जात होती.

शहरातून जाणाऱ्या नगर - दौंड - कुरकुंभ - फलटण राष्ट्रीय महामार्गावर २ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता हा अपघात झाला. राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सात परिसरातील म्हसोबा मंदिर समोर हा अपघात झाला. दुचाकीवरील (क्रमांक - एम.एच. ४२, ए. एम. १७४५) गणवेशातील पोलिस जवान उसाची वाहतूक करणार्या ट्रॅक्टर - ट्रॅाली खाली सापडून जागीच ठार झाले.

त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर - ट्रॅालींचे चाके गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. सदर पोलिस जवान यांचे नाव निष्पन्न झालेले नाही. महामार्गावर त्यांच्या मृतदेहाशेजारी काळ्या रंगाचे हेल्मेट आढळून आले. उसाच्या ट्र्रॅक्टरला (क्रमांक एम. एच. १२, जी. एन. ६५३२) दोन ट्रॅाल्या जोडलेल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT