St John Ambulance Brigade they provide patient care by Bohri community during Ganeshotsav
St John Ambulance Brigade they provide patient care by Bohri community during Ganeshotsav Sakal
पुणे

Ganpati Visarjan 2023 : पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत खाकी गणवेशातील देवदूत, बोहरीसमाजाची रुग्णसेवा

सम्राट कदम

पुणे : बेलबाग चौकात ‘पॅरा-मेडीक’च्या खाकी गणवेशात फिरणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. वादनावेळी झालेली गंभीर जखम असो की धक्का लागल्यामुळे खरचटले असेल, प्रथमोपचारासाठी ते तत्काळ धावत होते. सोफी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या या देवदूतांची चौकशी केले असता, ते सर्व बोहरी समाजातील सेवाव्रती निघाले. सेंट जॉन ॲम्ब्युलन्स ब्रिगेडच्या माध्यमातून ते गणेशोत्सवात रुग्णसेवा देत होते.

सेंट जॉन ॲम्ब्युलन्स ब्रिगेड या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून पुण्यात सोफी ॲम्ब्युलन्स कॉप्स म्हणून ते सेवा देतात. सरकारमान्य असलेली ही संस्था आपत्तीपासून ते युद्धजन्य स्थितीतही प्रथमोपचाराचे कार्य करते.

मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सवात प्रथमोपचार आणि रुग्णवाहिकेची सेवा देण्याचे काम हे समाजबांधव करतात. कासारवाडी, कोंढवा आणि खडकी विभाग मिळून २५ जवान आणि १५ नर्सिंग कर्मचारी कार्यरत आहे.

विसर्जनाच्या मिरवणुकीत सात जवानांनी रात्रभर सेवा दिली. जखमेवर मलमपट्टी, चक्कर आल्यास आवश्यक उपचार, सीपीआर ते रूग्णालयात दाखल करण्याचे कार्य या सेवाव्रतींनी केले. रक्तदान शिबीरे, आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि औषधांचा पुरवठा आदींचे कार्य ते करतात. अब्दुल तय्यब ठसरावला, मोहम्मद पटेल, मुफड्डाल तांडिवाला, इद्रिस हतीम शेख मियासाहेब, शब्बीर शाऊपुरवाला आदींनी गणेशविसर्जन मिरवणूकीत सेवा दिली.

मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सव आणि आषाढी वारीत आम्ही प्रथमोपचाराची सेवा देतो. सेवा देताना आम्ही कोणताच धर्म पाहत नाही, हीच आमच्या धर्मगुरूंनी शिकवण आहे. सेवेला धर्म नसतो, गणेशोत्सवाचे पाच ते सहा नागरिकांना आम्ही मदत केली.

- इद्रिस तय्यब ठसरवाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT