market yard1.jpg 
पुणे

पुणेकरांनो, मार्केट यार्डातील भुसार बाजाराबाबत महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड  (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ भुसार बाजार विविध उपायोजनांसह आठ दिवसानंतर पुन्हा सुरू झाला आहे. बाजारातील पंधरा व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुसार बाजार बंद ठेवण्यात आला होता. बाजार समितीच्या नियोजनामुळे सोमवार (ता. २५) पासून गूळ भुसार बाजार नियमित सुरू झाला आहे.

बाजार समितीकडून बाजारात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर केला जात आहे. तसेच सॅनिटायझर दिले जात आहे. बाधित परिसरातील लोकांना बाजारात प्रतिबंध केला आहे. बाजार सुरू झाल्यानंतर वाहनांची तसेच खरेदीदारांनी गर्दी टाळण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.

व्यापारी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गूळ-भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, बाजार समिती प्रशासक, पणन संचालक, दि पूना मर्चंट्स चेंबरचे पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. त्यांनतर जिल्हाधिकारी, प्रशासक, व्यापारी यांच्यात बैठक पार पडली. यामध्ये व्यापाऱ्यांना आवश्यक त्या लागणाऱ्या सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यांनतर चेंबरने भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भुसार विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. व्यापारी, कामगार यांनी काही उपायोजनेच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचना आणि बाजार समितीने अनेक उपायोजना केल्या आहेत. त्यामुळे बाजार आजपासून (ता.२५) नियमित सुरू झाला आहे.
बी.जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.


बाजार समितीने केल्या `या` उपायोजना
- भुसार मालाची दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडी राहणार

- सुकामेवा व पुरक दुकाने सकाळी 10 ते दुपारी 3 उघडी राहणार

- व्यापारी, हमाल, खरेदीदारांना मास्क वापरणे बंधनकारक

- बाजारात येणाऱ्या ग्राहकांत 3 ते 4 फुटांचे अंतर ठेवणे

- सॅनिटाटझरचा वापर करणे बंधनकारक

- सायंकाळी 6 नंतर बाजारात थांबण्यास बंदी

- गेट क्रमांक पाचमधून वाहनांना प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT