chandrakant patil sakal
पुणे

राज्य सरकारला कामगारांना साधा विश्वासही देता आला नाही - चंद्रकांत पाटील

राज्यात परप्रांतीय कामगारांना राज्य सरकारने विश्वास दिला असता तर कामगार आपल्या राज्यात परतले नसते. ते तिकडे परतल्यामुळे तिकडे कोरोना वाढला.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात परप्रांतीय कामगारांना राज्य सरकारने विश्वास दिला असता तर कामगार आपल्या राज्यात परतले नसते. ते तिकडे परतल्यामुळे तिकडे कोरोना वाढला.

वाघोली - मोदींनी कोरोना (Corona) काळात सर्व काही दिले. अगदी मास्क पासून लस (Vaccine) ही मोदींनीच (Narendra Modi) दिली. उद्योगांना पाठबळ ही मोदींनीच दिला. राज्य सरकारला साधे परराज्यातील कामगारांना (Worker) इथे रहा असा विश्वासही देता आला नाही. यामुळेच कामगार आपल्या राज्यात परतले. यामुळे कुणी कितीही टीका केली तरी मोदींचे वक्तव्य चुकीचे नाही. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सोमवारी काँग्रेस वर केलेल्या टिकेनंतर त्यांच्यावरही टीका होऊ लागली आहे. याबाबत पाटील यांना विचारले. ते पुढे म्हणाले, राज्यात परप्रांतीय कामगारांना राज्य सरकारने विश्वास दिला असता तर कामगार आपल्या राज्यात परतले नसते. ते तिकडे परतल्यामुळे तिकडे कोरोना वाढला. आत्ता टीका करणारे बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, संजय राऊत कुठे होते. ते कोरोना काळात लपून बसले होते. फक्त भाजप रस्त्यावर होता. रेल्वे जरी केंद्राने पाठविल्या तरी त्या मोकळ्या जाऊन द्यायच्या होत्या. तुमच्या दबावामुळे त्या पाठवाव्या लागल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नऊ हजार कोटींचा चेक लस विकत घेऊ म्हणून फडकविला.कुठे गेला तो चेक. लस तर मोदींनीच दिल्या.

यापुढेही सर लसीकरण मोदीच करतील. चांगल्याना थोपाटणे हा मोदींचा गुण आहे. म्हणून त्यांनी शरद पवार यांची स्तुती केली असेल. मोदींचा हा गुण तुम्ही घेतला पाहिजे. सर्व काही मोदीच देत आहेत. राज्य सरकारने काय दिले त्याची श्वेत पत्रिका जाहीर करावी.

ओबीसी आरक्षण मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. विधानसभेत व विधान परिषदेत जरी आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी सुप्रीम कोर्ट काय निकाल देते ते महत्वाचे आहे. निवडणुकीत आरक्षण असावे हे मलाही मान्य आहे. पुणे महापालीका निवडणुकीवर त्यांना विचारले असता, ते म्हणाले, राष्ट्रवादीने आपल्या फायद्याची प्रभागरचना केली आहे अशी चर्चा असली तरी मतदार तेच आहेत. यामुळे कुठलीही फोडाफोडी होणार नाही. भाजप 100 पेक्षा अधिक जागा महापालीकेत मिळवेल. असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT