Municipal-Recovery 
पुणे

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेने उचलली पावले

सकाळवृत्तसेवा

पुणे - मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजनेचा प्रयोग राबविताना न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील ८०० कोटी रुपये वसुलीसाठी महापालिकेने पावले उचलली आहे. वर्षानुवर्षे कराची थकबाकी न भरलेल्या मोबाईल कंपन्यांसह व्यावसायिक मिळकतधारकांकडे ही थकबाकी आहे. करआकारणीवर आक्षेप घेत या मिळकतधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी महापालिका आता जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत नव्याने काही वकील नेमले जाणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेला हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या मिळकतकराची सुमारे पावणेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या काही वर्षांपासून ती वसूल होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे अत्यावश्‍यक विकासकामांसह अन्य कामेही रखडली आहेत. त्यावर उपाय म्हणून आणि कराची थकबाकी वसूल होण्यासाठी थकबाकीदारांच्या दंडाच्या रकमेत ७० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत देणारी अभय योजना राबविली. त्यातून ३५५ कोटी रुपये जमा झाले आणि आता पुन्हा येत्या २६ जानेवारीपर्यंत ही योजना राबविली जात आहे.

मात्र, करआकारणीवरून न्यायालयात गेलेल्या काही प्रकरणांमुळे अशा मिळकत धारकांकडील थकबाकी वसूल होत नाही. ती वसूल करण्यासाठी या प्रकरणांतील नेमके आक्षेप, त्यावरील तडजोडी आणि परिणाम जाणून घेत, नवे आणि पुरेसे वकील नेमले जाणार आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरणे निकाली काढून अशा मिळकत धारकांकडील थकबाकी वसूल करणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी स्पष्ट केले.

कठोर कारवाई करणार 
पुणे शहरात विविध २० मोबाईल कंपन्यांनी आपापल्या सेवांसाठी टॉवर उभारले आहेत. त्यातील १३ कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत, तर एका कंपनीविरोधात महापालिकेनेच तक्रार केली आहे. उर्वरित सहा कंपन्यांनीही न्यायालयाकडे बोट करत कर भरण्यास नकार दिला आहे. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले, हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Ranji Trophy 4th Round: मुंबईची दणक्यात सुरुवात, मुशीर खान, सिद्धेश लाडची शतकं; महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या अडीचशे धावा पार

Thane News: तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू, ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा; प्रकरण काय?

Weekly Tarot Horoscope : 'या' आठवड्यात तयार होतोय गजकेसरी राजयोग; 4 राशींच्या सुखात होणार भरभराट !

Satara News : पुणे-बंगळुरु महामार्गावरील मोहिम फत्ते; वाहनधारकांचा जीव पडला भांड्यात!

SCROLL FOR NEXT