पुणे

लोणीकंद येथून चोरीला गेलेली दुचाकी भोरमध्ये जप्त

CD

भोर, ता. ७ : लोणीकंद (ता. हवेली) परिसरातून चार वर्षांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी भोर पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) वाहन तपासणी दरम्यान जप्त केली. याप्रकरणी दुचाकीचालक रोहित राजू जाधव (वय २०, रा. अनंतनगर, भोर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर एसटी बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिस हवालदार विशाल मोरे, दत्ता जाधव आणि दीपक गायकवाड वाहनांची तपासणी करत होते. या वेळी संशयावरून अडवलेल्या दुचाकीची (एमएच १२ एमएम ०४५७) कागदपत्रे चालक रोहित जाधव याच्याकडे नव्हती. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, ही दुचाकी संभाजी बोरुडे (रा. लोणीकंद) यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. बोरुडे यांच्याशी संपर्क साधला असता, सदर दुचाकी चार वर्षांपूर्वी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. भोर पोलिसांनी या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली असून, आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. जप्त केलेली दुचाकी लोणीकंद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीलेश माने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी! ११ ऑगस्टला पाणी साठवून ठेवा; 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

SCROLL FOR NEXT