पुणे : महापालिकेकडून शहरातील रस्ते खोदाई थांबविण्याचे नाव घेत नाही, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रोज वेगवेगळ्या भागात रस्ते खोदले जात आहेत. महापालिका आयुक्तांनी अनेकदा मुदतवाढ दिली पण कामे संपलेली नाहीत. आता पालखी सोहळा तोंडावर आला तरी रस्ते खोदले जात असल्याने पालखीच्या काळात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, सर्व रस्ते दुरुस्त करा अशी तंबी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. समान पाणी पुरवठा, मलःनिस्सारणाच्या नव्या वाहिन्या टाकणे व जुन्यांची देखभाल दुरुस्ती, पावसाळी गटार, मेट्रो याप्रकारची कामे शहरातील १७ रस्त्यांवर सुरू आहेत.
ही कामे आठवड्याभरात पूर्ण करा असे आदेश दिले होते, पण तरीही कामे सुरू आहेत. शहरात २२ ते २४ जून या दरम्यान संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शहरातील रस्त्यांच्या खोदकामाचा आढावा घेतला. त्यानंतर रस्त्यांवरील खोदाई थांबवून ते पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. तरीही काही ठिकाणी खोदाई असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित खाते प्रमुखांना ताबडतोब कामे बंद करा, रस्ता पुर्ववत करा असे आदेश दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.