पुणे

भोजणदरा परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात

सुदाम बिडकर

पारगाव : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील भोजणदरा परिसरात चार दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसाने विजेचे खांब खाली कोसळले. त्यामुळे परिसरातील घरे चार दिवसांपासून अंधारात आहेत. 

महावितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जारकरवाडी परिसरात गुरुवार (ता. 3) रोजी झालेल्या वादळी पावसाने भोजणदरा परिसरातील विजेचे खांब मोडुन पडल्याने विद्युत पुरवठा बंद पडला आहे.

परिसरातील विहीरवरील पंप, कडबाकुट्टी बंद असून परिसरातील सुमारे 25 ते 30 घरातील वीज गायब झाल्याने ही घरे चार दिवसापासून अंधारात आहेत. महावितरणला कळवूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याची नाराजी गणेश भाऊसाहेब भोजणे यांनी व्यक्त केली. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

Railway: मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्ट्यांची भेट, मुंबईतून ४६ विशेष गाड्या धावणार, पाहा वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT