पुणे

पगार नाही दिला तरी संप सुरूच राहणार; एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून संसाराचा गाडा चालविणे कठीण आहे. त्यामुळे महिन्याला मिळणाऱ्या पगाराचे सुख-दुःख कधी नव्हतेच.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून संसाराचा गाडा चालविणे कठीण आहे. त्यामुळे महिन्याला मिळणाऱ्या पगाराचे सुख-दुःख कधी नव्हतेच. नोव्हेंबर महिन्यातील सात दिवसांचा पगार दिला नसता तरी दुःख वाटले नसते. विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून पगार मिळाला नाही तरी (संप) दुखवटा सुरूच राहणार आहे, असे स्वारगेट स्थानकासमोरील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजी नगर), पुणे स्टेशन आगारांसह जिल्ह्यातील १३ डेपोतील कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एक महिन्यापासून संपात सहभागी झाले आहेत. प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार देण्यात आला. या महिन्यात संपूर्ण दिवस कामावर हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार तर सात कामावर हजर राहून त्यानंतर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना सात दिवसांचा पगार देण्यात आला आहे. तसेच जे कामगार या पुढे कामावर हजर होतील त्यांनाच पगार दिला जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे. यावर पगार नको विलीनीकरण करा, अशी भूमिका घेतली असल्याचे स्वारगेट स्थानकासमोरील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी उभारलेला मांडव काढण्यात सांगितले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सूचनेचे पालन करून मांडव काढून घेतला. मात्र त्यांनतर कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकड्यांना विरोध करून तेदेखील काढण्यास सांगितले. यापद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

आगार धावलेल्या बसेस हजर कर्मचारी

बारामती ३८ ८०

दौंड २० ७०

भोर ०६ ६

राज्यभरात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मांडव काढण्यासाठी सांगितले आहे, तसेच आगाराच्या आवारात तसेच गेटसमोर निदर्शने करण्यास बंदी घातली आहे. कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम संपकरी करीत आहेत. म्हणून कारवाई केली जात आहे.

- ज्ञानेश्वर रनवरे, विभागीय वाहतूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT