fad.jpg
fad.jpg 
पुणे

पुणे : हडपसरमध्ये महाजनादेश यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी

कृष्णकांत कोबल

मांजरी  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्यातील महाजनादेश यात्रा आज सायंकाळी सोलापूर महामार्गाने हडपसर मार्गे शहरात प्रवेश करीत आहे. त्यामुळे या यात्रेच्या स्वागताची येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करणार आहेत.

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन हजार दुचाकीस्वार तरूण मांजरी हद्दीत द्राक्ष संशोधन केंद्राजवळ या यात्रेचे स्वागत करून त्यामध्ये सहभागी होणार आहेत. शेवाळवाडी फाटा येथे मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी व फुरसुंगी येथील कार्यकर्ते यात्रेचे स्वागत करणार आहेत. पुढे लक्ष्मीकाँलनी, मांजरी फाटा, टेकवडे पेट्रोल पंप, आकाशवाणी, रविदर्शन चौक येथील स्वागत स्विकारत ही यात्रा गाडीतळ येथे येणार आहे. त्याठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री उपस्थितांना संबंधीत करणार आहेत. 

दरम्यान, त्यानंतर यात्रेचे जनसेवा बँकेजवळ स्वागत होणार आहे. मंत्रीमार्केट येथे आमदार टिळेकर १७० किलो वजनाच्या फुलांच्या हाराने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर गांधी चौक, वैभव थिएटर, मगरपट्टा चौक, रामटेकडी, बी.टी. कवडे रस्ता, फातिमानगर या ठिकाणी स्वागत होऊन यात्रा स्वारगेटच्या दिशेने जाणार आहे.

दरम्यान, परिसरात ठिकठिकाणी धनगरी वाद्य पथक, हलगी पथक व सात ढोलताशे पथके उभी करण्यात आली आहेत, अशी माहिती हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुभाष जंगले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT