Student Scholarship news sakal
पुणे

Student Scholarship : ...तर उद्योजक महिलांसाठी साडेसहा लाखांपर्यंत अनुदान; महिला आणि विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती घोषित

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्यावर्षी रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील पदवीपूर्व, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी आणि उद्योजक महिलांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Student Scholarship - पुणे नॉलेज क्लस्टरच्या (पीकेसी) वतीने संशोधन क्षेत्रात कार्यरत महिला आणि विद्यार्थिनींसाठी Student Scholarship शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली आहे. वैज्ञानिक संशोधनासाठी महिलांना प्रोत्साहन ‘वी ज्ञान’ उपक्रमाअंतर्गत ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ जुलै आहे.

अल्प उत्पन्न गटातील आणि उपेक्षित समाजातील पदवीपूर्व स्तरावरील मुलींना तीन महिन्यांसाठी १० हजार रुपये प्रति महिना, पदव्युत्तर स्तरावरील मुलींना पंधरा हजार रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली जाईल.

तर उद्योजक महिलांसाठी साडेसहा लाखांपर्यंत अनुदान आणि सहा महिन्यांसाठी १५ हजार रुपये प्रति महिना या प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी माहिती पीकेसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिया नागराज यांनी दिली.

पीकेसीने बीएएसएफ केमिकल्स या कंपनीबरोबर केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्यावर्षी रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील पदवीपूर्व, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी आणि उद्योजक महिलांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली.

गेल्यावर्षी आलेल्या २५० अर्जांतून सात पदवीपूर्व विद्यार्थिनी, दहा पदव्युत्तर विद्यार्थिनी आणि उद्योजिका विभागातून चार पीएच.डी. विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनी, उद्योजक महिलांना आवश्यक मार्गदर्शन, संस्था-तज्ज्ञांच्या भेटी अशा स्वरुपात मदत केली जाईल, असे डॉ. नागराज यांनी सांगितले.

अधिक माहिती व पात्रतेसाठी - https://www.pkc.org.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT