Pune Crime News
Pune Crime News  
पुणे

Pune Crime News :  पुणे हादरलं! रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

Sandip Kapde

Pune Crime News : पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या नामांकित कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे.

याप्रकरणी विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव राज रावसाहेब गर्गे  (वय २२, मूळ रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) आहे. याप्रकरणी त्याचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी निरूपम जयवंत जोशी याच्याविरूध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निरूपम हा राज याला सतत मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून राजने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, राज याच्या मध्यस्थीने जोशी याला काही पैसे उसने घेऊन दिले होते. परंतु, ते पैसे जोशी परत देत नव्हता. त्यामुळे तो मानसिक तनावात आला होता. या तनावातून राजने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT