पुणे

चाकणच्या विद्यार्थ्यांचे लादवडला श्रमशिबिर

CD

चाकण, ता. १७ : नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे कै. भागूबाई पिंगळे कला, वाणिज्य, विज्ञान रात्र महाविद्यालय, चाकण येथील विद्यार्थ्यांचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच लादवड (ता. खेड) या ठिकाणी झाले.
या शिबिराच्या प्रारंभी संत शिरोमणी सावता महाराज मंदिर या ठिकाणी संस्था अध्यक्ष एन. डी. पिंगळे, सचिव डॉ. शीतल टिळेकर, संस्था संचालक डॉ. संदेश टिळेकर, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य एस. एच. बुट्टे, संस्था समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर दुधवडे, ज्युनिअर कॉलेज प्राचार्य अनिल ठोंबरे, संस्था संचालक मच्छिंद्र भुजबळ, निर्मला वाळूंज, विवेक भुजबळ, ग्रामसेवक जाधव, विद्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी सात दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विद्यापीठ धोरणानुसार शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन या अंतर्गत गावामध्ये ग्रामस्वच्छता, धार्मिक स्थळ स्वच्छता, वृक्षारोपण, तलाव स्वच्छता आदी कामांमध्ये सहभागी होऊन योगदान दिले. दररोज सायंकाळच्या सत्रात आरोग्य, आजचा युवक व संत, जगणे सुंदर आहे, गावापासून दुरावलेला तरुण, अंधश्रद्धा निर्मुलन व सर्प शेतकऱ्यांचा मित्र या विषयावर अभ्यासू व्याख्याते यांची व्याख्याने झाली. समारोपप्रसंगी रामदास ढवळे, सरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील उपस्थित होते. उपप्राचार्य एस. एच. बुट्टे यांनी शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्व विद्यार्थी व प्रमुखांचे आभार मानले. प्रा. के. एन. जैद यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जावेद तांबोळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT