dengue
dengue 
पुणे

एक हजार घरांमधून विद्यार्थ्यांनी डेंगीची 24 उत्पत्तीस्थाने केली नष्ट

सकाळवृत्तसेवा

भवानीनगर (पुणे) : जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चिला जात असलेल्या सणसर डेंगी निर्मूलन मोहिमेस आज (ता. 11) सुरवात झाली. उद्या (ता. 12) ती भवानीनगरमधील तपासणीनंतर पूर्ण होणार आहे. आज दिवसभरात फक्त सणसर व गावच्या 12 वाड्या-वस्त्यांमधील 893 कुटुंबांमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 2 हजार 163 कंटेनरची तपासणी केली. तब्बल 24 घरांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या. 

आज सणसरमध्ये डेंगी निर्मूलन मोहिमेत 150 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह आरोग्य खात्याचे कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून 200 जणांनी 26 पथके तयार करून आज अडीच किलोमीटर अंतरातील घरांची तपासणी केली. पहिल्याच दिवशी उत्साही विद्यार्थ्यांनी 2 हजार 163 कंटेनर तपासले. त्या-त्या कुटुंबातील लोकांना डेंगी व स्वाईन फ्ल्यूची माहिती व प्रतिबंधक उपाययोजना याविषयी माहिती दिली. नियोजनबद्ध व शिस्तबध्द रित्या ही मोहिम झाली. सणसर गावातील डेंगीची उत्पत्तीस्थाने एकाचवेळी नष्ट झाल्याने डेंगी रोखण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे सरपंच संध्या काळे व उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी सांगितले. आता ग्रामपंचायत व आरोग्य विभाग या परिसरात धुरळणी करणार आहे. 

मागील वर्षाप्रमाणेच याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या मदतीने डेंगी रोखण्याचा सणसर पॅटर्न यशस्वी झाला. आज छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या शाखेतील विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी झाले, तब्बल 26 पथके व तीन रुग्णवाहिका या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे महाविद्यालयाचे प्राध्यापकही स्वतः पथकामध्ये सहभागी होते. सणसरच्या सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, माजी सरपंच राहूल काळे, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, नानासाहेब निंबाळकर, छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य भापकर, सणसर विकास मंचाचे पुष्पराज निंबाळकर, आरोग्य भागाचे विस्तार अधिकारी दिलीप जगताप, सणसरचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे शिवाजी कोथमिरे, पद्माकर धर्माधिकारी, प्रमोद पाठक, राहूल घुले, अविनाश चौधर, पोपट देवकर, पोपट लांबाते, योगीनाथ घोडके यांनी आजच्या मोहिमेचे नियोजन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT