Exam Sakal
पुणे

स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांकडे हवा ‘प्लॅन बी’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वेळेत न होणे, निकाल वेळेवर न लागणे, नियुक्त्या रखडणे, अशा विविध कारणांमुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागते.

- मीनाक्षी गुरव

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC Exam) वेळेत न होणे, निकाल वेळेवर न लागणे, नियुक्त्या रखडणे, अशा विविध कारणांमुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे (Student) भवितव्य टांगणीला लागते. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांतून दरवर्षी हजाराच्या आसपास पदे भरली (Recruitment) जातात. मात्र, त्यासाठी तब्बल साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी (Registration) करतात. परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने नियुक्ती न झाल्यास दुसरा पर्याय म्हणजेच ‘प्लॅन बी’वर अनेक जण काम करत आहेत. (Students Need Plan B While Appearing for Competitive Exam)

स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करताना काहीच हाती न येणारे विद्यार्थी आता तेवढ्याच जिद्दीने त्यांनी ठरविलेल्या ‘प्लॅन बी’वर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येत आहे. ‘तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर वास्तवाची जाणीव ठेवून ‘प्लॅन बी’ हा कायम ठेवायला हवा’, असा सल्ला हे तरुण देत आहेत.

अभ्यासिका चालविणारे उमेश

सांगोलासारख्या दुष्काळी भागातून आलेले उमेश घाडगे यांनी सुरुवातीची पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. चांगला अभ्यास करूनही निकालामधील अनिश्चितता याला कंटाळून अखेर उमेश यांनी दुसरा पर्याय शोधण्याचे ठरविले. यातूनच त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात सुविधा पुरविण्याचे ठरविले आणि अभ्यासिका सुरू केली. उमेश हे सध्या पुण्यात तीन अभ्यासिका, तीन वसतिगृहे (मुलांसाठी) चालवीत आहेत.

साईनाथ झाले प्रकाशक

साईनाथ डहाळे हे २०१३मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आलेले. सतत प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित यश न आल्यामुळे अखेर त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये प्रकाशन संस्था सुरू केली. याद्वारे आता ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तके प्रकाशित करत आहेत. तसेच त्यांनी नव्याने ॲकॅडमी सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.

हॉटेल व्यावसायात उतरलेले सुशील

बीड जिल्ह्यातील यवता (ता. केज) गावातून केवळ प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्नं घेऊन सुशील काटकर हे २०१६मध्ये पुण्यात आले. त्यानंतर चार वर्षे एमपीएससीची तयारी केली. परंतु त्यांना परीक्षेत यश आले नाही. त्यानंतर परीक्षेची तयारी सोडून सुशील हॉटेल व्यावसायात (म्हणजेच प्लॅन बी) उतरले. आता नवी पेठेत ते स्नॅक सेंटर चालवत आहेत.

अनेकांनी निवडलेले दुसरे पर्याय...

  • हॉटेल, खानावळ, कपडे व पुस्तक विक्री, स्नॅक्स सेंटर, कॉफी सेंटर

  • अभ्यासिका, वसतिगृहे, पुस्तकाचे वितरण, मार्गदर्शन करणे

  • शेती व शेतीला पूरक व्यवसाय करणे

  • पदवी शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातील नोकरी

  • मित्रांना एकत्रित घेऊन स्टार्टअप सुरू करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT