Pune News  sakal
पुणे

Pune News : कडूसच्या दक्षणा फौंडेशनमधील विद्यार्थ्यांना विषबाधा ; सुमारे शंभर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

येथील दक्षणा फाउंडेशन मधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता.खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महेंद्र शिंदे

कडूस (ता.खेड) : येथील दक्षणा फाउंडेशन मधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता.खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

दक्षणा फाउंडेशन ही सेवाभावी आणि गैरसरकरी संस्था आहे. ही संस्था ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल परंतु अभ्यासातील हुशार विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रान्सच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. सध्या येथे सुमारे तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.१९) रात्री पासून जुलाब, तीव्र डोकेदुखी व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने उपचारासाठी त्यांना कडूसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर चांडोली येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुमारे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी आणण्यात येत असून यात विद्यार्थ्यांनींचा सुद्धा सहभाग आहे. यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती जास्तच बिघडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT