Pune University sakal
पुणे

Pune University : विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करावे - डॉ. भरत काळे

‘दर दिवसाला जगात अनेक बदल होत आहेत, त्या अनुषंगाने सध्या सरकारही दर शंभर दिवसाचे नियोजन करून त्याप्रमाणे आढावा घेत आहे.

मीनाक्षी गुरव

‘दर दिवसाला जगात अनेक बदल होत आहेत, त्या अनुषंगाने सध्या सरकारही दर शंभर दिवसाचे नियोजन करून त्याप्रमाणे आढावा घेत आहे.

पुणे - ‘दर दिवसाला जगात अनेक बदल होत आहेत, त्या अनुषंगाने सध्या सरकारही दर शंभर दिवसाचे नियोजन करून त्याप्रमाणे आढावा घेत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील या बदलत्या जगाचा आढावा घेत समाजाच्या प्रश्नांवर उत्तरे शोधणारे संशोधन करावे,’ असे सेंटर फॉर मटेरिअल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीचे (सीमेट) महासंचालक डॉ. भरत काळे यांनी सुचविले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेची विद्यापीठ पातळीवरील फेरी मंगळवारी झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. काळे बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता व सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. काळे म्हणाले, ‘अनेक मोठे प्रश्न सध्या भेडसावत आहेत. ई-कचरा, पडीक जमीन सुपीक करणे, शेती व तंत्रज्ञान यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन हे केवळ भर घालणारे नाही तर नव्याने काही गोष्टी निर्माण करणारे असावे.’

डॉ. सोनवणे म्हणाले, ‘आपल्या अवतीभोवतीचे जग समजून घेत प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला की त्यातूनच नव्या कल्पना शोधता येतात. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान नाही तर मानवता हे देखील संशोधनाचे खूप मोठे क्षेत्र आहे.’ यावेळी प्रा. काकासाहेब मोहिते यांनी ‘आविष्कार’ स्पर्धेची माहिती दिली.

ही स्पर्धा सुरवातीला महाविद्यालय पातळीवर घेण्यात आली. यात चार हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यातून विभागीय स्तरावर स्पर्धा झाली असून त्यातून २३३ प्रकल्प निवडण्यात आले. आता विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा होत असून त्यातून ४८ प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन वामन यांनी केले. तर प्रा. रवींद्र जायभये यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफटत नेले अन्...

IND vs NZ, 4th ODI: न्यूझीलंड ऑलआऊट, तरी भारतासाठी विजय कठीण! आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं, ते घडवण्याची संधी

'त्या सेटवर नेमकं काय घडलं, मला सगळ्यांनी सांगितलं'; नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

श्रीवर्धनला 'ब्ल्यू फ्लॅग'! सागरी किनाऱ्याला जागतिक स्तरावर नवी ओळख; रोजगाराची संधी

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँक अध्यक्षांची निवड बुधवारी; महेंद्र लाड, विश्वजित कदम, देवराज पाटील शर्यतीत

SCROLL FOR NEXT