panchnama Sakal Media
पुणे

पंचनामा : आरे, ऐक नाऽ... देवा, ऐक नाऽऽ

देवबाप्पा, आम्ही मुले गमतीने ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का?’ हे गाणं म्हणतो. मात्र, त्याची एवढी दखल घेऊन, आमची शाळाच बंद पाडशील, असं कधी वाटलं नव्हतं.

सु. ल. खुटवड

देवबाप्पा, आम्ही मुले गमतीने ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का?’ हे गाणं म्हणतो. मात्र, त्याची एवढी दखल घेऊन, आमची शाळाच बंद पाडशील, असं कधी वाटलं नव्हतं.

प्रिय देवबाप्पा,

गेल्या सव्वा वर्षापासून शाळा नाही, मित्रांबरोबर खेळणं नाही की कुठं फिरणं नाही. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं म्हटलं जातं; पण आमच्याबाबत उलटंच घडतंय. माझ्यासारख्या अनेक छोट्या मित्रांना घरात कोंडून ठेवल्यामुळे मी तुझ्यावर रूसलो आहे. आई-बाबांवर मी रुसलो की ते मला छान छान खेळणी देऊन माझी समजूत घालतात. माझे हट्ट पुरवतात. आता मी तुझ्यावर रुसलो आहे. आई-बाबांसारखंच तू माझं ऐकशील ना? (Subhash Khutwad write an article about God and devotee)

माझे बाबा डॉक्टर आहेत. ते माझे खूप लाड करायचे. मला उचलून माझे पापे घ्यायचे. मला खांद्यावर घेऊन, खूप भटकायचे; पण आता मला जवळही येऊ देत नाहीत. कित्येक महिन्यांत मला त्यांनी उचलूनही घेतलं नाही. दवाखान्यातून आल्यानंतर अंघोळ करतात आणि दुसऱ्या खोलीत जाऊन दार बंद करून बसतात. आई त्यांना जेवणाचे ताट नेऊन देते. मग मी दाराबाहेर त्यांची वाट पाहात कित्येक तास बसून राहतो. त्यांच्या कुशीत शिरावं म्हणून मी तळमळत असतो. माझ्या डोळ्यांतील अश्रूंनी फरशी भिजते. ‘माझ्या हातून पाणी सांडलंय’ असं मी आईला खोटंच सांगतो. माझे बाबा माझ्याशी असं का वागतात? माझं काही चुकलं का? तसं असेल तर मी त्यांची माफी मागतो. पण प्लीज, त्यांना मला जवळ घ्यायला सांग. माझ्या केसांवरून हात फिरवत, ‘गुलाबाचं फूल रुसलंय का’? असं विचारायला सांग.

देवबाप्पा, ‘कोरोनामुळं बाहेर जायचं नाही’ असं आजी सारखी म्हणते. कसली भीती दाखवायची असली की आजी मला असंच काहीतरी सांगते. बागुलबुवापेक्षाही कोरोना डेंजर आहे का? तसं असेल तर तू कोरोनाला शिक्षा का करत नाहीस?

मला माझ्या मित्रांबरोबर खूप खेळायचं असतं. दंगा-मस्ती करायची असते; पण आम्हाला घराबाहेर कोणीच सोडत नाही. आम्ही फक्त खिडकीतून एकमेकांना पाहत बसतो. कधीतरी आई मित्रांबरोबर फोन लावून देते. दोन-तीन मिनिटं आम्ही बोलतो. असं किती दिवस नुसतं फोनवर बोलत बसायचं?

देवबाप्पा, आम्ही मुले गमतीने ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का?’ हे गाणं म्हणतो. मात्र, त्याची एवढी दखल घेऊन, आमची शाळाच बंद पाडशील, असं कधी वाटलं नव्हतं. ‘आठवड्यात रविवार येतील का रे तीनदा’ असं आम्ही हसत-खेळत म्हणायचो म्हणून आठवड्यातील सातही दिवस आम्हाला रविवारसारखे नकोत.

सुटी मिळाल्याने आम्हाला सुरुवातीला आनंद झाला. पण वर्षभर कुठं सुटी असते का? शाळेतल्या गमती-जमती मी आई- बाबांना सांगायचो. पण आता कशाच्या गमती-जमती सांगू रे?

देवबाप्पा, मोबाईलवरून कुठं अभ्यास होतो का? मॅडम काय बोलतात, हेच आम्हाला नीट कळत नाही. आमचं कोणाचंच लक्ष लागत नाही. मग आई ‘लक्ष कुठंय तुझं’ असं माझ्यावरच ओरडते. यात माझा काय दोष आहे का? परीक्षा न घेताच आम्हाला यंदा पास करण्यात आलं. हे असं आयतंच पुढल्या वर्गात जायचं मला पटलं नाही. त्यामुळं यंदा पास झाल्याचे पेढे नाहीत की बाबांचं गिफ्टही नाही.

ता. क. ः देवबाप्पा, आमच्या घरात पिंजऱ्यात पोपट पाळला होता. मी त्याच्याकडं सारखं बघत बसायचो आणि त्याच्याशी बोलायचो. माझीही अवस्था त्या पिंजऱ्यातील पोपटासारखीच आहे. मी आई-बाबांकडे हट्ट धरून, पोपटाला मोकळं करायला लावलं. ज्या दिवशी त्याला पिंजऱ्यातून सोडलं, त्या दिवशी त्याला खूप आनंद झाला असावा. मिठू मिठू करतच त्याने आकाशात उंच भरारी घेतली. देवबाप्पा, माझ्यासारख्या मुलांनाही या पिंजऱ्यातून सोडव रे. आम्हालाही उंच भरारी घेऊ दे. आम्हालाही खेळू दे, बागडू दे. लवकरच माझीही इच्छा तू पूर्ण कर. तसं झाल्यास मी बनविलेली दोन कागदी विमाने व एक छोटी बाहुली तुला भेट देईल.

तुझाच छोटा मित्र, अमेय

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नंदुरबार नगरपरिषद निकाल आज; 470 उमेदवारांचे भवितव्य ठरेल स्पष्ट

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT