success in saving leopard calf fell into well incident in ambegaon pune Sakal
पुणे

Pune News : आंबेगावातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुखरुप सुटका

बछडा झुल्यावर बसल्यानंतर झुला अलगदपणे वर ओढून घेण्यात आला.

नवनाथ भेके निरगुडसर

निरगुडसर : आंबेगाव येथील कारफाटयावर विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग,रेक्यू टिमला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले, बछड्याला जीवदान दिल्याची घटना सोमवारी (ता.१३) रोजी घडली.

रांजणी जवळील कारफाटा येथे चार ते पाच शेतकऱ्यांची मिळून एकत्रित विहीर आहे. सकाळी संतोष गोपाळे हे वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून डरकाळी फोडणारा आवाज आला,त्यांनी विहिरीत डोकावले तर बिबट्याचा बछडा हा वीजपंपाच्या झोपाळ्यावर त्यांना दिसला.त्यांनी लगेचच वनविभागाला घटनेची कल्पना दिली.

वनविभाग व रेस्क्यू टिम घटनास्थळी दाखल झाली.वन विभागाच्या रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी झुला तयार करून तो दोरांचा साह्याने विहीरीत सोडून रेस्क्यू टिमचे दोन सदस्य खाली उतरुन बछड्याला झुल्याच्या दिशेला हुसकले. बछडा झुल्यावर बसल्यानंतर झुला अलगदपणे वर ओढून घेण्यात आला. बिबट बछड्याला अवसरी घाट वन उद्यानात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपया सार्वकालिक नीचांकी, डॉलरच्या तुलनेत ६४ पैशांनी कोसळून ९३.५३ वर

Chhatrapati Sambhajinagar News: भोकरदनमध्ये दुर्दैवी घटना; खदानीत बुडून माय-लेकीचा मृत्यू, परिसरात शोककळा

Income Tax: १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा; नव्या करप्रणालीचा ‘प्रारंभ’ देशभर सुरू

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

SCROLL FOR NEXT